वनडे विश्वचषक 2023 मधील 22 वा सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खेळला जातोय. सोमवारी (23 ऑक्टोबर) चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियम येथे हा सामना खेळला जातोय. सामन्याआधी झालेल्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
https://www.instagram.com/reel/Cyu-7z6vASE/?igshid=MzRlODBiNWFlZA==
या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्रत्येकी एक बदल केला. मोहम्मद नवाज आजारी असल्यामुळे त्याच्याजागी पाकिस्तान संघात शादाब खान याला संधी मिळाली. तर, अफगाणिस्तान संघाने वेगवान गोलंदाज फजलहक फारूखी याच्या जागी युवा चायनामन फिरकीपटू नूर अहमद याला संघात स्थान दिले.
या सामन्यात विजय मिळवल्यास पाकिस्तान संघाचे उपांत्य फेरीसाठीचे आव्हान मजबूतीने कायम राहील. तर, अफगाणिस्तान इंग्लंडनंतर आता पाकिस्तानला पराभूत करण्याच्या प्रयत्नात असेल.
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन:
पाकिस्तान
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ
अफगाणिस्तान
रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, इक्रम अलखिल (यष्टीरक्षक), मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, नूर अहमद.
(Pakistan Won Toss And Elected Bat First Afganistan Play With Four Spinners)
आयसीसी स्पर्धेत ‘ही’ उंची गाठणं येड्या गबाळ्यांच काम नाही, सचिन-गेलला न जमलेली कामगिरी विराटने केली
अफगाणिस्तान पाकिस्तानलाही धक्का देण्याच्या तयारीत! चेपॉकवर रंगणार फिरकीचे युद्ध