पाकिस्तानची माजी महिला क्रिकेटपटू आणि पहिली महिला समालोचक मरिना इकबाल ही हिल्स सॅंडल प्रकरणामुळे जास्तच चर्चेत आली आहे. पाकिस्तानचा क्रिडा पत्रकार कादिर ख्वाजाने हिल्स सँडलमुळे तिच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रणामात ट्रोल करायला सुरुवात केली. पण मरिनाने आता सत्य जगासमोर आणले आहे.
झाले असे की, मरिना एका सामन्यापुर्वी प्रशिक्षक, पंच यांच्याशी चर्चा करण्यासाठी मैदानावर गेली होती. त्यानंतर कादिरने मरिनाचा मैदानावरील एक फोटो ट्विटरवर शेअर केला आणि लिहिले की, “हिल्स असणारे सँडल घालून मैदानावर जाणे, हे समालोचकांच्या नियमांमध्ये येते का?.”
कादिरचे हे अर्धवट माहिती असलेले ट्विट पाहिल्यानंतर मरिना चांगलीच वैतागली. तिने आपला दूसरा फोटो शेअर करत दाखवून दिले की, तिने सपाट हील असलेले शूज घातले आहेत. तो फोटो शेअर करत तिने लिहिले की, “अर्धवट माहिती ही खूप धोकादायक ठरू शकते कादिर. मी खेळपट्टीवर सपाट शूज घातले होते, तर सामन्यााधी हिल्स सँडल घातले होते. मी एक माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे, त्यामुळे मला सर्व नियम माहिती आहेत.”
کیا پچ پر ہیل والی جوتی پہن کر ٹہلنا قانونی ہے؟؟؟
رائے چاہیے@sohailimrangeo @anussaeed1 @Shoaib_Jatt @hashmi_shahid @MarinaMI_24 @NT20Cup @TheRealPCB #NationalT20Cup #NT20CUP pic.twitter.com/2dF7Jug5SK— Qadir Khawaja (@iamqadirkhawaja) October 5, 2020
Half knowledge can be dangerous Qadir. It's flats on pitch and heels in pre match. I am a former Pakistan player, I know the protocols. pic.twitter.com/8DcrG8UWgT
— Marina Iqbal (@MarinaMI_24) October 5, 2020
३३ वर्षीय मरिनाने ८ वर्षे पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. २००९ साली तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ३६ कसोटी सामने खेळत ४३६ धावा आणि ४२ वनडे सामने खेळत ३४० धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१७ साली तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पुढे तिने समालोचन क्षेत्र निवडले.
महत्त्वाच्या बातम्या-
थोडक्यात वाचला कोहली! नाहीतर बसला असता ‘विराट’ दणका
माही तुझी विक्रमाची भूक कधी भागणारच नाही का? पाहा धोनीने यष्टीमागे केलेला ‘महा’विक्रम
दुष्काळात तेरावा महिना.!! युएईला गेलेल्या क्रिकेटर्सच्या पगारात होणार कपात?
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलच्या ‘या’ ५ संघांतील गोलंदाजांना तोड नाही, केलाय सर्वाधिक वेळा हॅट्रिक घेण्याचा कारनामा
‘या’ ४ कारणांमुळे कमलेश नागरकोटीला भारतीय संघात मिळणार स्थान
वाढदिवस विशेष: इम्रान खान यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी