पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर भारत आणि भारतीय क्रिकेटवरील आपल्या वक्तव्यासाठी चर्चेत राहत असतो. त्याने नुकतेच भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये ३ सामन्यांच्या वनडे मालिकेचे आयोजन करून कोरोना व्हायरसविरुद्ध लढाईसाठी पैसे जमा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यापूर्वी त्याने भारताकडून १०,००० व्हेंटिलेटर घेण्यास विरोध केला होता.
यानंतर तो आता पुन्हा चर्चेत आला आहे. कारण त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल (MS Dhoni) वक्तव्य केले आहे. धोनीबद्दल बोलताना शोएब (Shoaib Akhtar) म्हणाला की, धोनीला २०१९च्या विश्वचषकानंतर निवृत्ती घ्यायला हवी होती.
“धोनीने आपल्या सर्वश्रेष्ठ कामगिरीने भारतीय संघाला मोठ्या उंचीवर आणले आहे. त्याने आता आदरपूर्वक क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) घेतली पाहिजे. मला माहिती नाही की तो निवृत्ती घ्यायला एवढा वेळ का लावत आहे. त्याने विश्वचषकानंतरच निवृत्ती घ्यायला पाहिजे होती. जर मी त्याच्या जागी असतो तर मी लगेच निवृत्ती घेतली असती,” असे पीटीआयशी बोलताना शोएब म्हणाला.
“मी ३-४ वर्षांपर्यंत मर्यादित षटकाच्या क्रिकेटमध्ये खेळू शकत होतो. परंतु मी २०११ विश्वचषकानंतर निवृत्ती घेतली. कारण मी १००टक्के पूर्ण कामगिरी करत नव्हतो. त्यामुळे धोनीने एवढा वेळ घेतला नाही पाहिजे,” असेही शोएब पुढे म्हणाला.
धोनीने जुलै २०१९नंतर क्रिकेटचा एकही सामना खेळलेला नाही. तो आयपीएल २०२० नंतर (IPL 2020) आपल्या पुनरागमनासाठी (Comeback) तयार होता. परंतु आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्यात आले. तत्पूर्वी धोनी देशांतर्गत क्रिकेट सामने आणि न्यूझीलंड दौऱ्यावरही गेला नाही. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत निवडण्यासाठीही अनुपस्थित होता.
धोनीने आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) सराव सत्रात भाग घेण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाची तयारी सुरु केली होती.
धोनीने ९ महिने क्रिकेट खेळलेले नाही. त्यामुळे जरी धोनी निवडीसाठी तयार असला, तरी निवड समिती त्याची निवड करू शकत नाही. त्यामुळे तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये भारत ‘अ’ किंवा झारखंड संघासाठी पुनरागमन करू शकतो.
धोनीने आतापर्यंत ९० कसोटी सामने, ३५० वनडे सामने आणि ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत त्याने ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या आहेत. तर वनडेत ५०.५७ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या आहेत. त्यात १० शतके आणि ७३ अर्धशतकांचा समावेश आहे.
त्याचबरोबर टी२०त त्याने ३७.६० च्या सरासरीने १६१७ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कोरोनाच्या लढ्यात महाराष्ट्रातील धोनीप्रेमींचा मदतीचा हात
-जी गोष्ट धोनीने गेल्या १० वर्षात नाही केली ती या वर्षी करत होता
-रोहित जेव्हाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतो तेव्हा त्यांना नडतोच