भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक होता. धोनीने त्याच्या कर्णधारपदात भारतीय संघाला आयसीसीच्या तीनही (एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) स्वरूपाचे जेतेपद मिळवून दिले होते. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये धोनीचे एक वेगळेच महत्त्व आहे. धोनी ना केवळ भारतातच, तर संपूर्ण जगभरात खूप लोकप्रिय आहे. आता पाकिस्तानचा एक खेळाडू देखील धोनीचा खूप मोठा चाहता असल्याचे दिसून आले.
पाकिस्तानी क्रिकेटर फहीम अशरफ धोनीचा खूप मोठा चाहता आहे. त्याने आपल्या घरात धोनी सोबतचा एक फोटो देखील लावला आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होत आहे. फहीमने धोनी सोबत एक सेल्फी काढली होती. फहीमने तोच फोटो फ्रेम करून भिंतीवर लावले आहे.
हा फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा भारतीय चाहत्यांनी देखील त्याचे कौतुक केले. महेंद्रसिंग धोनी भारताव्यतिरिक्त पाकिस्तानमध्ये देखील खूप लोकप्रिय आहे. त्यातच पाकिस्तानचा सध्याचा क्रिकेटपटू अशरफ देखील धोनीचा खूप मोठा चाहता असल्याचे स्पष्ट झाले.
https://www.instagram.com/p/CTStsGIBiaO/
अशरफने त्याच्या घरी त्याच्या संघ सहकारी असलेल्या क्रिकेटपटूंना एका डिनर पार्टीसाठी बोलवले होते. यादरम्यान डिनर पार्टीच्यावेळी फहीमच्या भिंतीवर असलेला धोनीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावेळी फहीमच्या डिनर पार्टीसाठी हसन अली, हॅरिस रऊफ आणि शादाब खान यांसारख्या क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती.
पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू फहीम अशरफने ११ कसोटी सामने, ३३ एकदिवसीय सामने आणि ४२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. फहीमने २०१७ साली त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
तसेच धोनी सोबतची त्याची सेल्फी असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, अनेक चाहत्यांनी त्याच्यावर कमेंट्स देखील केले. त्यामध्ये काहींनीतर लिहिले होते की, धोनीचा क्रिकेटपटूंच्या जीवनावर किती मोठा प्रभाव आहे ते या फोटोवरून दिसून येते.
https://www.instagram.com/p/CTT9XXgshHy/
धोनी हा भारतीय क्रिकेट इतिहासातील अत्यंत यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीने आयसीसीच्या तीनही स्वरुपात भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. तसेच २००९ साली भारतीय संघ त्याच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकावर देखील राहिला होता. धोनी २००८ साली भारतीय संघाचा सर्व क्रिकेट प्रकारात कर्णधार बनला होता. त्यानंतर धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
महत्वाच्या बातम्या –
–बड्डेदिनी ‘या’ ३ भारतीय क्रिकेटपटूंना बसाव लागलं बाकावर; इशांत, शमीचाही समावेश
–युएई टप्प्यासाठी DC च्या नेतृत्त्वाचे चित्र स्पष्ट; पंत की अय्यर, कोणाला मिळणार ‘गुड न्यूज’?
–सलामी जोडीच्या अभेद्य भागिदारीनंतरही भारताचा मार्ग खडतर, विजयासाठी २५०ची आघाडीही अपुरी!