पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाने झिम्बाब्वे संघावर १ डाव आणि १४७ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच पाकिस्तान संघाने ही मालिका २-० ने आपल्या नावावर केली आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाकडून आबिद अलीने सर्वाधिक २१५ धावा केल्या; तर अजहर अलीने १२६ धावांची खेळी केली होती. तसेच या सामन्यात नौमान अली आगळ्या वेगळ्या प्रकारे बाद झाल्याचे दिसून आले आहे. यासोबतच त्याने एक नवीन विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात पाकिस्तान संघाने फलंदाजी करताना ५१० धावांचा डोंगर उभारला होता. या डावात नौमान अलीने तुफानी खेळी करत ९७ धावा केल्या होत्या. त्याने ८व्या गडी साठी १६९ धावांची भागिदारी केली होती. त्याला अवघ्या ३ धावांमुळे आपले पाहिले शतक झळकावता आले नव्हते.
तर झाले असे की, या डावातील १४८ व्या षटकात तेंदई चिसोरोने वाईड चेंडू फेकला होता. परंतु चपळ यष्टीरक्षकाने चेंडू हातात येताच काही सेकंद प्रतिक्षा केली. त्यानंतर नौमान अलीला यष्टीचीत केले होते. जेव्हा नौमानने तो वाईड चेंडू सोडला तेव्हा तो क्रिजच्या आतच होता. परंतु जेव्हा त्याने पाय हलका उचलला तितक्यात यष्टीरक्षकाने त्याला यष्टीचीत केले होते. त्यानंतर तिसऱ्या अंपयारने देखील त्याला बाद घोषित केले होते. अशाप्रकारे बाद झाल्यामुळे त्याला आपले पहिले शतक झळकावता आले नाही.
नौमान अली या सामन्यात ९ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने अवघ्या १०४ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकार लगावत ९७ धावांची खेळी केली होती. यासोबतच तो पाकिस्तान संघासाठी ९ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धाव करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी आसिफ इक्बालने १९६७ मध्ये १४६ धावांची खेळी केली होती.
https://youtu.be/6u4LFVV9Pag
पाकिस्तान संघाने मिळवला एकहाती विजय
पाकिस्तान संघाने या पूर्ण सामन्यात झिम्बाब्वे संघाला बॅकफूटवर ठेवले होते. पाकिस्तान संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ५१० धावा करत डाव घोषित केला होता. त्यांनतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाला अवघ्या १३२ धावा करण्यात यश आले होते. त्यानंतर पाकिस्तान संघाने झिम्बाब्वे संघाला फॉलोऑन दिला होता. दुसऱ्या डावात देखील झिम्बाब्वे संघाचे फलंदाज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले होते. त्यांना सर्वाबाद २३१ धावा करण्यात यश आले होते. हा सामना पाकिस्तान संघाने १ डाव १४७ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
विरोधकांची चिंता शिगेला; आगामी टी२० विश्वचषकासाठी श्रीलंकेचा ‘हा’ दिग्गज गोलंदाज करणार पुनरागमन!
टीम इंडियाला १८चा खतरा; मागील ६ वर्षे नडलेल्या या अनलकी तारखेला विराटसेना यंदा बनवणार लकी?