भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहे. भारताने आपले पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. आता पुढील सामन्यात भारताला पाकिस्तान संघाचा सामना करायचा आहे. हा सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाचा माजी अष्टपैलू शोएब मलिक याने भारतीय संघाचे कौतुक केले आहे. यावेळी त्याने भारत आणि पाकिस्तान संघाची तुलनाही केली.
शोएब मलिक (Shoaib Malik) याने दोन्ही संघांची तुलना करत सांगितले की, दोन्ही संघांमधील सर्वात मोठा फरक काय आहे. त्याच्यानुसार, भारताचा एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला, तर त्यांना काहीही फरक पडत नाही. कारण, त्यासाठी त्यांच्याकडे पर्याय आहेत. मात्र, नसीम शाह याच्या दुखापतीनंतर त्यांचा संघ पूर्ण होऊ शकत नव्हता.
मलिकचे विधान
शोएब मलिक याच्यानुसार, भारतीय संघाकडून शानदार राखीव खेळाडू आहेत. त्याने पाकिस्तानच्या एका चॅनेलशी बोलताना म्हटले की, “शुबमन गिल दुखापतग्रस्त झाला, तर त्याची जागी इशान किशनने घेतली आणि संघाला कोणतीही उणीव भासली नाही. जर इशानही नसता, तर दुसरा कोणता फलंदाज आला असता. तेच आमच्या संघात नसीम शाह दुखापतग्रस्त झाला, तेव्हा आम्हाला दुसरा गोलंदाजही मिळू शकत नव्हता. आम्ही संघ घोषित करू शकत नव्हतो की, कुणाला घेऊन जावे.”
नसीम शाह बाहेर, गिल आजारी
पाकिस्तान संघाचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह आशिया चषक 2023 स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो संपूर्ण विश्वचषकातून बाहेर पडला. सध्या पाकिस्तानला नसीमची उणीव भासत आहे. तसेच, भारतीय संघाविषयी बोलायचं झालं, तर संघ सध्या शानदार फॉर्मात आहे. मात्र, युवा सलामीवीर शुबमन गिल आजारी असल्यामुळे त्याला स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्याला मुकावे लागले. मात्र, संघाला त्याची उणीव म्हणावी तशी भासली नाहीये.
नसीम शाह याच्याविषयी बोलायचं झालं, तर त्याच्या जागी विश्वचषकात पाकिस्तान संघात हसन अली याला सामील केले गेले आहे. आतापर्यंतचे त्याचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. अशात त्याने पुढील सामन्यातही चांगला खेळ दाखवावा, अशी संघाला अपेक्षा असेल. (pakistani cricketer shoaib malik impressed with indian team bench strength gives shubman gill and naseem shah example)
हेही वाचा-
ऑस्ट्रेलिया बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला कशी रोखणार? बावुमाची सेना करणार बॅटिंग; सामन्यात महत्त्वाचे 3 बदल
‘इतक्या वर्षांमध्ये…’, सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडल्यानंतर ख्रिस गेलसाठी काय बोलला रोहित?, वाचाच