चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत अजूनही काहीच ठरलेलं नाही. टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास तयार नाही. या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना माजी फिरकीपटू हरभजन सिंग म्हणाला होता की, खेळाडूंची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे. यामुळे भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानात का जावं? यावर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तन्वीर अहमद यानं यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं भज्जीवर टीका करताना चक्क शब्दांची मर्यादा ओलांडली.
तन्वीर अहमद यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानं हरभजनसाठी लिहिलं की, जर भारतानं पाकिस्तानात खेळायला येवू नये असं तुला वाटतं तर तू पाकिस्तानी खेळाडूंना का भेटतोस. तन्वीरनं या पोस्टमध्ये भज्जीला खालच्या दर्जाचं म्हटलं आहे. यासोबतच इतर अश्लील शब्दही लिहिण्यात आले आहेत. तन्वीरनं लिहिलं की, तुमच्या देशात काय होतं हे मला माहीत आहे.
हरभजन सिंग म्हणाला होता की, पाकिस्तानमध्ये रोज काहीतरी घडत असतं. टीम इंडियासाठी तिथे जाणं धोकादायक आहे. मी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निर्णयासोबत असल्याचं भज्जीनं सांगितलं होते. बीसीसीआयनं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिलेली नाही.
जर टीम इंडिया पाकिस्तानात नाही गेली तर ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित केली जाऊ शकते. यापूर्वीही असं घडलं आहे. शेवटची आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानात होणार होती. परंतु भारतीय संघानं पाकिस्तानाता जाण्यास नकार दिला, ज्यानंतर टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकेत खेळले गेले. यावेळीही टीम इंडिया आपले सामने श्रीलंका किंवा दुबईत खेळू शकते.
Abey @harbhajan_singh doghley insan ager to bolta ha india ko pakistan nahi jana chahiye tou doghley insan ghatiya insan phir pakistani players say tou kyn milta ha humain bhi pata ha ghatiya insan tere mulk main kia hota ha
— Tanveer Says (@ImTanveerA) July 25, 2024
हेही वाचा –
विराटनंतर रिंकू सिंगने सूर्यकुमार यादवकडे मागितली बॅट, पण नव्या कर्णधाराने केलं असं काही
महिला आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचाच दबदबा, रेकॉर्ड असा की विश्वासच बसणार नाही!
“शमीला रोज 1 किलो मटण नाही मिळालं तर त्याचा गोलंदाजीचा वेग…”, जवळच्या मित्राचा अजब खुलासा