क्रिकेटजगतातून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. रविवारी (१६ मे) पाकिस्तानच्या कराची शहरात क्रिकेट सामन्यादरम्यान उमर खान नावाच्या क्रिकेटपटूचा अकनाक मृत्यू झाला आहे. आपल्या संघाने सामना जिंकल्यानंतर तो जल्लोष साजरा करत होता. अशात अचानक तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला त्वरित जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजत आहे. त्याला पत्नी आणि २ मुले आहेत.
माध्यमांतील वृत्तांनुसार, उमर खान (Umar Khan) कराचीमध्ये अनु भाई पार्कमध्ये क्रिकेट सामना खेळत होता. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असलेल्या उमर खानने शेवटचे षटक गोलंदाजी करताना आपल्या संघाला सामना जिंकून दिला. परंतु सामन्यातील शेवटचा चेंडू फेकल्यानंतर अचानक त्याची तब्येत बिघडली. त्याचे संघ सहकारी सामना विजयाचा आनंद साजरा करत असताना उमर खान मैदानावर बेशुद्ध पडला. त्यानंतर लगेचच त्याच्या संघ सहकाऱ्यांनी त्याला अब्वासी रुग्णालयात नेले, जिथे त्याला मृत घोषित (Umar Khan Died Of Heat Stroke) करण्यात आले.
उमर खान क्लब क्रिकेट खेळण्याबरोबर बँकेतही नोकरी करत असायचा. त्याला क्रिकेटची आवड असल्याने तो नियमित क्लब क्रिकेट खेळत असायचा. आता त्याच्यापाठी त्याची पत्नी आणि २ मुले आहेत. त्याच्या पत्नीला ब्लड कँसर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अस्मयच्या हॅटट्रिकने लौकिक एफएचा विजय