---Advertisement---

पराभव पचेना! पाकिस्तान ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल हारला आणि दु:खात चाहता दुबईच्या मैदानातच झोपला

On: शुक्रवार, नोव्हेंबर 12, 2021 4:10 PM
---Advertisement---

जगभरात क्रिकेट या खेळाचा मोठा चाहतावर्ग आहे. अगदी क्रिकेटपटूंप्रमाणे चाहतेही आपल्या संघाच्या प्रत्येक सामन्याला खूप गांभीर्याने घेत असतात. त्यातही आयसीसीच्या विश्वस्तरीय स्पर्धांमधील सामने म्हटले की, चाहत्यांच्या भावनांचे हिंदोळे उचंबळून येतात. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारी (११ नोव्हेंबर) झालेल्या टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्यानंतरही असेच काहीसे दृश्य पाहायला मिळाले.

संपूर्ण स्पर्धेत अजेय राहिलेल्या पाकिस्तान संघाला उपांत्य फेरी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ५ विकेट्सने पराभवास सामोरे जावे लागले. त्यानंतर पाकिस्तान संघाचा एक चाहता पराभवाच्या निराशेत मैदानातच झोपून राहिल्याचे पाहायचे मिळाले.

अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट्सच्या नुकसानावर १७६ धावा केल्या होत्या. त्यांच्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीला ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजी ढेपाळत असल्याचे दिसले. परंतु पुढे सलामीवीर डेविड वॉर्नर, मॅथ्य वेड आणि मार्कस स्टॉयनिस यांच्या आक्रमक खेळींमुळे ऑस्ट्रेलियाने १ षटक बाकी असताना ५ विकेट्सने सामना जिंकला.

ऑस्ट्रेलियाच्या विजयासह पाकिस्तानचा टी२० विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला. संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शनानंतर चषकाच्या इतक्या नजीक येऊन संघाला मानहानिकारक पराभवास सामोरे जावे लागले. याचे दुख मोमिन साकिब नामक पाकिस्तानी चाहत्याला सहन झाले नाही. तो सामन्यानंतर दुबईच्या मैदानातच झोपल्याचे दिसले. शेवटी त्याचा मित्र त्याला तिथून नेताना दिसतो. परंतु तो पाणावलेल्या डोळ्यांनी मैदानाकडे पाहताना दिसतो. त्याने या व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये ‘हमारी अधुरी कहानी’ हे गाणे जोडले.

https://www.instagram.com/reel/CWJXS3fhKOc

तसेच त्या चाहत्याने अजून एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये तो पाकिस्तान संघाच्या पराभवावर निराशा व्यक्त करताना दिसतो आहे. सोबतच त्याने पाकिस्तानी खेळाडूंच्या प्रदर्शनाचे कौतुकही केले आहे.

https://www.instagram.com/reel/CWJZJ8_BRGo

विशेष म्हणजे, हाच चाहता भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टी२० विश्वचषक सामन्यानंतर आपल्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

फखर जमानच्या ‘बुलेट’ शॉटपासून थोडक्यात वाचले पंच, नाहीतर घडली असती दुर्घटना; बघा थरारक व्हिडिओ

Video: मॅथ्यू वेडचे ‘ते’ ३ सलग षटकार, ज्यामुळे पाकिस्तानच्या हातून निसटले फायनलचे तिकीट

अलीच्या हातून ‘तो’ झेल सुटला अन् कोट्यवधी पाकिस्तानी चाहत्यांचे हृदय तुटले, छोटी मुलेही ढसाढसा रडली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---