पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये बाबर आझम सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. दरम्यान, प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या एका चाहत्यानं बाबरला आवाज लगावत त्याला चांगलचं ट्रोल केलं. त्याची ट्रोलिंग ऐकून बाबर आझम चिडलेला दिसला.
हा प्रेक्षक बाबर आझमला उद्देशून म्हणाला, “टी20 संघात तुझी जागा नाही. तू परत जा.” तो प्रेक्षक एवढ्यावरच थांबला नाही. तो पुढे म्हणाला, “अरे तुला राग येतोय. तू टाळ्या वाजवा आणि कॅच सोड.” प्रेक्षक हे सर्व पंजाबी भाषेत बोलत होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. तुम्ही तो येथे पाहू शकता.
Pakistan fans disrespecting Babar Azam in Sydney. “Teri jagah nahin banti T20 team mein” 👎🏼👎🏼👎🏼
This is not acceptable at all. He’s our former captain and he’s our pride. Sharam karo sab. Stay strong, @babarazam258 🇵🇰♥️https://t.co/MbI4GHytMw
— Farid Khan (@_FaridKhan) November 17, 2024
बाबर आझमची बॅट गेल्या काही वर्षांपासून अगदीच शांत आहे. ऑस्ट्रेलियातही तो धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. एकदिवसीय मालिकेत त्यानं एकूण तीन सामने खेळले. या तीन डावात फलंदाजी करताना त्याला केवळ 80 धावा करता आल्या. मात्र, या काळात तो दोनदा नाबाद राहिला. परंतु त्याचा दर्जा लक्षात घेता ही कामगिरी चांगली म्हणता येणार नाही.
बाबर आझमनं या दौऱ्यात दोन टी20 सामन्यात भाग घेतला. मात्र तो दोन्ही डावात वाईटरित्या फ्लॉप झाला. पहिल्या सामन्यात तो अवघ्या तीन धावा करून बाद झाला. तर दुसऱ्या सामन्यातही तो केवळ तीन धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या या कामगिरीवर पाकिस्तानी चाहते नाराज आहेत.
ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान मालिकेतील पुढील सामना 18 नोव्हेंबरला होबार्ट येथे होणार आहे. बाबर आझम येथे धावा करण्यात यशस्वी होईल, अशी आशा आहे. पाकिस्तान संघ शेवटच्या सामन्यात सन्मानासाठी खेळेल. शेवटचा सामना जिंकून मालिका 1-2 अशी करण्याचा संघाचा प्रयत्न असेल.
हेही वाचा –
आर अश्विन मोडू शकतो कपिल देवचा मोठा रेकॉर्ड, फक्त मालिकेत संधी मिळायला हवी!
“बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकायची असेल, तर विराटला…”, मायकेल क्लार्कची कोहलीबाबत मोठी प्रतिक्रिया
IND vs AUS: ‘जर मी त्याच्या जागी असतो…’, रोहित शर्माच्या ब्रेकवर सौरव गांगुलीची स्पष्ट प्रतिक्रिया