टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12 फेरीच्या चौथ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) संघ आमने- सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने 4 गडी राखून सामना जिंकला. या सामन्यात भारताच्या विजयाचा नायक विराट कोहली (Virat Kohli) ठरला. मात्र, भारताने हा विजय इमानदारीने मिळवला नसल्याचा आरोप केला आहे. अखेरच्या षटकात घडलेल्या नो बॉल नाट्यामुळे हा आरोप केला जातोय.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. अखेरच्या षटकात विजयासाठी 16 धावांची आवश्यकता असताना हार्दिक पंड्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. दुसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिक याने एक धाव काढली. तिसऱ्य चेंडूवर एक धाव काढत कोहलीने स्ट्राइक आपल्याकडे ठेवली. पुढील चेंडू मात्र मोहम्मद नवाझने फुलटॉस पद्धतीचा टाकला. हा चेंडू विराटने सीमापार भिरकावून षटकार वसूल केला. त्याचवेळी विराटने हा चेंडू कमरेच्यावर असल्याचे निदर्शनास आणून देत नो बॉलची मागणी केली. मैदानावरील दोन्ही पंचांनी ही मागणी ग्राह्य धरत नो बॉल दिला. पंचांचा हा निर्णय पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम व इतर खेळाडूंना पटला नाही. नो बॉल नंतर मिळणाऱ्या फ्री हिटवर विराट बाद झाला. मात्र, पुन्हा विराट व कार्तिक यांनी तीन धावा धावत भारताला विजयाच्या नजीक आणले. अखेरीस रविचंद्रन अश्विनने भारताच्या विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
A foot outside the crease, never a no ball. absolute disgrace. A big crime.#T20WorldCup | #INDvPAK pic.twitter.com/g8miMwDzR9
— Scott Bennett (@scottbennetth) October 23, 2022
No ball free hit bowled three runs lol!! Very much like how england won the world cup over maximum boundaries! Gentleman game rules are harsh sometimes!
— Aiman Anwar (@aimanunver) October 23, 2022
भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानी चाहत्यांनी नो बॉलमूळे आपला पराभव झाल्याचे म्हटले. पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू ऐमन अन्वरने भारताच्या या विजयाची तुलना 2019 वनडे विश्वचषक अंतिम सामन्यात इंग्लंडने मिळवलेल्या विजयाशी केली. तसेच क्रिकेटच्या नियमांवर देखील नाराजी दर्शवली. तसेच काहींनी हा नो बॉल कसा हा प्रश्न देखील विचारला. विराटचा पाय क्रीज बाहेर असल्याने नो बॉल नसावा अशी मागणी अनेकांनी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सव्याज परतफेड! विराटच्या ऐतिहासिक खेळीने मेलबर्नमध्ये पाकिस्तान चारीमुंड्या चित; विश्वचषकात विजयी सुरुवात
मुस्कुराने की वजह तुम हो! पाकिस्तानच्या फलंदाजाला बाद करताच पंड्याने दिली स्माईल, व्हिडिओ व्हायरल