टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शनिवारी (७ ऑगस्ट) भालाफेक या खेळात भारताचा शेवटचा ऍथलिट नीरज चोप्रा उतरला होता. या स्पर्धेत त्याच्याकडून भारतीय चाहत्यांना पदकाच्या प्रचंड अपेक्षा होत्या. त्या सर्व अपेक्षा नीरजने पूर्ण केल्या. त्याने या स्पर्धेदरम्यान दुसऱ्या प्रयत्नातच सर्वाधिक ८७.५८ मीटर अंतराचा थ्रो केला. यामुळे त्याचा विजय निश्चित झाला आणि त्याने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. त्याच्या या विजयानंतर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. यामध्ये एका व्यक्तीच्या शुभेच्छाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
याच स्पर्धेत पाकिस्तान संघाचाही भालाफेकपटू होता. त्याचं नाव अर्शद नदीम असे आहे. विशेष म्हणेज नीरजला अर्शदकडूनही खास शुभेच्छा मिळाल्या आहेत. (Pakistani Javelin Thrower Arshad Nadeem Delete His Tweet Said Neeraj Chopra His Idol)
अर्शदने ट्वीट करत लिहिले की, “टोकियो ऑलिंपिक्समध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यामुळे तुझं अभिनंदन नीरज.”
https://twitter.com/ArshadNadeemPak/status/1424008557461114880
नीरजला म्हटले होते आपला आदर्श
विशेष म्हणजे त्याने यापूर्वी आणखी एक ट्वीट केले होते. त्यात त्याने नीरजला आपला आदर्श असल्याचे सांगत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. तो ट्वीट करत म्हणाला होता की, “सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन माझा आदर्श नीरज चोप्रा. क्षमस्व पाकिस्तान मी तुमच्यासाठी पदक नाही आणू शकलो.”
हे ट्वीट त्याने लगेच डिलीट केले होते. मात्र, त्याच्या ट्वीटचे स्क्रीनशॉट्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
https://twitter.com/thenatdoc/status/1424015485738180610
अशी केली ती ऐतिहासिक कामगिरी
पात्रता फेरीत ८६.६५ मीटर भालाफेक करून नीरज अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. अंतिम फेरीत तो दुसऱ्या स्थानावरून सुरुवात करत होता. त्याने आपल्या पहिल्या संधीमध्ये ८७.०३ मीटर भालाफेक करत आघाडी घेतली. दुसऱ्या संधीमध्ये त्याने आणखी सुधारणा करत ८७.५८ मीटर भाला फेकला. पहिल्या फेरीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या संधीमध्ये तो ७६.७९ मीटरची फेक करू शकला.
अंतिम आठमध्ये देखील तो अव्वल भालाफेकपटू म्हणून सहभागी झाला. तो अखेरच्या तीन संधीमध्ये त्याची पहिली फेक चुकीची ठरवण्यात आली. मनासारखी फेक न झाल्याने अंतिम फेरीतील दुसऱ्या संधीत त्याने फॉल थ्रो केला. सहाव्या आणि अखेरच्या संधीमध्ये ८४.०२ मीटरचा भाला त्याने फेकला. मात्र, त्याची दुसरी ८७.५८ मीटरची फेक त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यास पुरेशी होती.
महत्वाच्या बातम्या-
-अभिमानास्पद! अभिनव बिंद्रानंतर ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा दुसराच भारतीय
-इतिहास घडला! भारताच्या नीरज चोप्राने मिळवले भालाफेकीत सुवर्णपदक