येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात होत असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाला धक्का बसला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह विश्वचषकातून बाहेर पडला आहे. नसीम शाह याला अलीकडेच पार पडलेल्या आशिया चषक 2023 स्पर्धेत दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषक स्क्वॉडमध्ये सामील केले गेले नाहीये. अशात नसीमने ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
नसीम शाह विश्वचषकातून बाहेर
शुक्रवारी (दि. 22 सप्टेंबर) पाकिस्तान क्रिकेट (Pakistan Cricket Team) संघाचा मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक याने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली. यामध्ये नसीम शाह (Naseem Shah) याच्या नावाचा समावेश नव्हता. यानंतर नसीमने ट्विटर अकाऊंटवर आपल्या भावना मांडल्या.
काय म्हणाला नसीम?
नसीमने ट्वीट करत लिहिले की, “अतंत्य जड अंत:करणाने सांगावे लागत आहे की, मी या अद्भूत संघाचा भाग बनू शकणार नाही, जो आमच्या प्रिय देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. मी निराश आहे, पण तरीही माझा विश्वास आहे की, सर्वकाही परमेश्वराच्या हातात आहे. इंशाअल्लाह, मी खूप लवकर मैदानावर पुनरागमन करेल. मी प्रार्थनांसाठी तुम्हा सर्व चाहत्यांना धन्यवाद देतो.”
With a heavy heart, I'm sharing that I will not be part of this amazing team that will be representing our beloved country. While I'm disappointed, I believe everything is in Allah's hands. InshahAllah will be on the field very soon.
Thank you to all my fans for the prayers!
— Naseem Shah (@iNaseemShah) September 22, 2023
नसीम शाह याच्या या भावूक पोस्टवर त्याचे पाकिस्तान संघाच्या सहकाऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या. मोहम्मद हॅरिस याने पोस्ट लिहिली. त्याने यामध्ये एक फोटो शेअर करत लिहिले की, “नसीम माझा खांदा घे.”
Stay strong dost ❤️ pic.twitter.com/SWSKscGpdq
— Muhammad Haris (@iamharis63) September 22, 2023
आशिया चषक 2023 स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाच्या वेगवान गोलंदाजी फळीत- शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ यांचा समावेश होता. त्यामुळे त्यांचा गोलंदाजी विभाग मजबूत वाटत होता. मात्र, आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत भारतीय फलंदाजांनी या तिन्ही गोलंदाजांविरुद्ध खोऱ्याने धावा काढल्या होत्या. त्यानंतर हॅरिस आणि नसीम दुखापतग्रस्त झाले होते. आता हॅरिस विश्वचषकाच्या संघात परतला आहे, पण नसीम पुनरागमन करू शकला नाही. त्याच्या जागी हसन अली याला संधी मिळाली आहे.
विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हॅरिस रौफ, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम-उल-हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम ज्युनियर, सलमान अली आघा, सौद शकील, शाहीन शाह अफरीदी आणि उसामा मीर (pakistani pacer naseem shah post an emotional post after ruled out from the icc cricket world cup 2023 squad)
हेही वाचा-
‘बाप-बाप होता है…’, सुपरस्टार शाहरुखच्या ट्वीटवर सेहवागचे भन्नाट उत्तर; सर्वत्र रंगलीय चर्चा
वॉर्नरचे धक्कादायक कृत्य! हातमिळवणी करायला गेलेल्या जडेजावर उगारला हात, फॅन्सच्या तळपायाची आग मस्तकात- Video