---Advertisement---

पाकिस्तानात पोहोचला ‘सर जडेजा’! आफ्रिदीने भारतीय फिरकीपटूच्या गोलंदाजीची केली नक्कल, झाला ट्रोल

---Advertisement---

क्रिकेट क्षेत्रात सहसा प्रत्येक क्रिकेटपटूची क्रिकेट खेळण्याची स्वतंत्र्य शैली असते. जसे की, चेतेश्वर पुजारा त्याच्या संथ आणि बचावात्मक फलंदाजीसाठी ओळखला जातो, तर जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजी करताना अनोख्या पद्धतीने हात फिरवतो. बऱ्याचदा काही क्रिकेटपटू इतर दिग्गज क्रिकेटपटूंकडून आदर्श घेत त्यांच्या शैलीचा अंगिकार करण्यासाठी प्रयत्नशील असतात. पाकिस्तान क्रिकेट संघाचा एक गोलंदाजही असेच काहीसे करताना दिसला आहे. परंतु यामुळे त्याला प्रचंड टिकेचा सामना करावा लागला आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Tour Of Pakistan) असून उभय संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळवला गेला असून हा सामना अनिर्णीत राहिला आहे. यानंतर १२ मार्चपासून उभय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी कराची येथे आमने सामने येतील. या सामन्यासाठी पाकिस्ताननच्या संघाने सरावाला सुरुवातही केली आहे.

पाकिस्तानच्या पहिल्या सराव सत्रादरम्यान त्यांचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी (Shaheen Afridi) डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करताना दिसला आहे. त्याची ही गोलंदाजीची शैली हुबेहूब भारताचा फिरकीपटू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja)याच्यासारखी होती. त्यामुळे त्याचा नेट सेशनमध्ये जडेजाच्या गोलंदाजीची नक्कल करतानाचा (Shaheen Afridi Copying Ravindra Jadeja) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर शाहिन आफ्रिदी ट्रोल
पाकिस्तानचा पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारतीय संघाच्या गोलंदाजाच्या गोलंदाजी शैलीची नक्कल केल्यामुळे आफ्रिदी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल (Shaheen Afridi Trolled) होतोय. त्याच्या नेट सेशनमध्ये जडेजाच्या गोलंदाजी शैलीची नक्कल करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्याचबरोबरच त्याला ट्रोलही केले जात आहे. यावरून आफ्रिदी अधिकतर भारतीय चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.

आफ्रिदीच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘आफ्रिदी जडेजाची नक्कल करतोय. यात आश्चर्याची कोणती गोष्ट नाहीये. कारण यापूर्वी बाबर आझमही विराट कोहलीची नक्कल करत शानदार फलंदाज बनला आहे.’

https://twitter.com/kabaddifanclub1/status/1502137445777047556?s=20&t=WttIqkNiRiZbiDOxOc5u6Q

 

तसेच अजून एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘असे झाले असेल की, जडेजा मोहालीवरून चुकीचे विमान पकडले असेल आणि बंगळुरूऐवजी कराचीमध्ये पोहोचला असेल.’

रविंद्र जडेजा पहिल्या कसोटी विजयाचा नायक
दरम्यान ३३ वर्षीय जडेजा नुकताच त्याच्या प्रदर्शनामुळे चर्चेत आला आहे. त्याने मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मोठा विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते. त्याने या सामन्यात भारताकडून फलंदाजी करताना सर्वाधिक नाबाद १७५ धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजी करताना दोन्ही डावात मिळून सर्वाधिक ९ विकेट्सही घेतल्या होत्या. त्याच्या या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याचमुळे कदाचित आफ्रिदीने त्याच्या गोलंदाजी शैलीची नक्कल केली असावी.

महत्त्वाच्या बातम्या-

विश्वचषकात पाकिस्तान महिला संघाकडून मोठी चूक; एकाच षटकात टाकले ‘इतके’ चेंडू

मलिंगा इज बॅक! यावर्षी मुंबई नव्हेतर ‘या’ संघाला देणार धडे

मोहाली कसोटीचा नायक जडेजाला दुसऱ्या सामन्यात विश्रांती? उपकर्णधार बुमराहने सांगितले…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---