क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक फलंदाज झाले आहेत ज्यांनी अविश्वसनीय रेकाॅर्ड त्यांच्या नावावर केले आहेत. त्यांचा रेकाॅर्ड मोडण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण पाकिस्तान क्रिकेटलाही अविश्वसनीय रेकाॅर्ड बनवणारा फलंदाज मिळाला. तो फलंदाज एकेकाळी पाकिस्तानच्या मधल्या फळीचा जीव होता. आता तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. हा खेळाडू पाकिस्तानचा मोहम्मद युसूफ (Mohammad Yousuf) आहे.
युसूफ हा पाकिस्तानच्या स्टायलिश फलंदाजांपैकी एक आहे. त्यानं आपल्या फटकेबाजीनं चाहत्यांची मनं जिंकली. युसूफनं 1998 ते 2010 दरम्यान पाकिस्तानसाठी 98 कसोटी सामने खेळले आणि 52.3 च्या सरासरीनं 7,530 धावा केल्या. या काळात त्यानं 24 शतकं आणि 33 अर्धशतकं झळकावली. युसूफनं 288 एकदिवसीय सामन्यांमध्ये 15 शतकं आणि 64 अर्धशतकांच्या मदतीनं 9,720 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सरासरी 41.7 होती. 3 टी20 सामन्यांमध्ये त्यानं पाकिस्तानसाठी 50 धावा केल्या आहेत.
27 ऑगस्ट 1974 रोजी जन्मलेला मोहम्मद युसूफ (Mohammad Yousuf) आता 50 वर्षांचा आहे. आपल्या कसोटी कारकिर्दीत त्यानं दक्षिण आफ्रिका वगळता सर्व देशांसाठी शतकी खेळी खेळली. 18 वर्षांपूर्वी युसूफ उत्कृष्ट खेळाडू होता. 2006 मध्ये त्यानं एका कॅलेंडर वर्षात 1,000 धावांचा टप्पा पार केला होता. त्यानं एकूण 9 धमाकेदार शतकं झळकावली होती.
युसूफनं झळकावलेल्या शतकांपैकी इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर द्विशतक होते आणि 3 वेळची धावसंख्या 190च्या आसपास होती. त्याच्या 1,788 धावा फक्त 19 डावात झाल्या. एका कॅलेंडर वर्षात कसोटीत कोणत्याही फलंदाजानं केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. महान फलंदाज सचिन तेंडुलकरलाही (Sachin Tendulkar) हा रेकाॅर्ड मोडता आला नाही. सध्याचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीही (Virat Kohli) यापासून दूर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ खेळणार 2 सराव सामने, वाचा कधी आणि कोणाशी भिडणार?
“यंदा टी20 विश्वचषक जिंकणार” भारतीय कर्णधाराचं मोठं वक्तव्य
पहिल्यांदाच टी20 विश्वचषक खेळणार ‘या’ भारतीय क्रिकेटपटू, डब्लूपीएलमध्ये केलंय शानदार प्रदर्शन