पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याला लवकरच ब्रिटिश नागरिकता मिळणार आहे. ब्रिटेनची वकील नरजिस खान हिच्याशी आमिरने लग्न केल्यामुळे त्याला लवकरच ब्रिटिश पासपोर्ट मिळणार आहे. या प्रक्रियेला अजून एका वर्षाचा कालावधी लागू शकतो. ब्रिटिश पारपोर्ड मिळाल्यानंतर आमिर इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळू शकतो, ज्याविषयी पाकिस्तान संघाच्या या दिग्गजाने खास प्रतिक्रिया दिली.
मोहम्मद आमिर (Mohammad Amir) याला येत्या काळात ब्रिटिश नागरिकत्व मिळाल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेठ आणि इंडियन प्रीमियर लीग खेळणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पाकिस्तानच्या माजी गोलंदाजने स्वतः या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. मोहम्मद आमिर म्हणाला, “ब्रिटिश नागरिकत्व घ्यायला मला अजून एक वर्ष लागणारआहे. एका वर्षानंतर परिस्थिती काय असेल, हे पाहावे लागणार आहे. सध्या मी एक-एक पायरी पुढे चाललो आहे. पुढे काय होईल, मला माहीत नाहीये. असे काही झालेच, तर नक्की मी तुम्हाला याविषयी माहिती देईल.”
ब्रिटिश नागरिकत्व मिळाल्यानंतर आमिर इंडियन प्रीमियर लीग खेळण्यासाठी पात्र होईल. याविषयी पाकिस्तानी दिग्गज म्हणाला, “मी पाकिस्तानमध्ये खेळलो आहे आणि आता इंग्लंडसाठी खेळण्याची इच्छा नाहीये. आयपीएल 2024 साठी अजून एक वर्ष वेळ आहे. उद्या काय होईल, हे आम्हाला माहीत नाहीये. पासपोर्ट मिळाल्यानंतर ज्या चांगल्या संधी मिळतील, त्याचा मी फायदा घेईल.” 31 वर्षीय मोहम्मद आमिरच्या कारकिर्दीचा विचार केला, तर पाकिस्तान क्रिकेट संघासाठी 36 कसोटी, 61 वनडे आणि 50 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 250पेक्षा अधिक विकेट्सची नोंद आहे. 2020 मध्ये त्याने पाकिस्तान संघासाठी शेवटचा सामना खेळला होता.
आयपीएलची सुरुवात 2008 साली झाली होती. लीगच्या पहिल्या हंगामात पाकिस्तानी खेळाडूंनी प्रवेश दिला गेला होता. पण 2008 साली मुंबई बॉम्बस्फोट हल्यानंतर बीसीसीआय आणि भारत सरकारने पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये प्रवेश नाकारला. पाकिस्तानचा अजहर महमूद 2012 ते 2015 सालापर्यंत आयपीएल खेळला, पण तेव्हा तो ब्रिटिश नागरिक होता. (Pakistani players will play IPL with British citizenship)
महत्वाच्या बातम्या –
VIDEO । वेस्ट इंडीजला पोहोचता आपापसात भिडला भारतीय संघ! पाहा कोण कोणाच्या बाजूने
Ashes 2023 । हेडिंग्ले कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा! दोन प्रमुख खेळाडू संघातून आउट