पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना सबिना पार्क स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात पाहुण्या पाकिस्तान संघाला १ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान पाकिस्तान संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवानने एक अप्रतिम झेल टिपला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.
पाकिस्तान संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो यष्टीच्या मागे देखील अप्रतिम यष्टीरक्षण करण्यासाठी ओळखला जातो. वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी त्याने जोमेल वारीकनचा अप्रतिम झेल टिपला होता, जे पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले होते.
तर झाले असे की, पाकिस्तान संघाकडून शेवटच्या डावातील ५३ वे षटक टाकण्यासाठी हसन अली गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथा चेंडू हसन अलीने शॉर्ट चेंडू टाकला होता. ज्यावर जोमेल वारीकनने हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा प्रयत्न फसला आणि चेंडू बॅटचा कडा घेत थर्डमॅनचा दिशेने गेला होता. त्यावेळी यष्टिरक्षण करत असलेल्या मोहम्मद रिजवानने धाव घेत सीमारेषेजवळ डाईव्ह मारत अप्रतिम झेल टिपला. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Pakistani wicketkeeper Mohammad Rizwan taken unbelievable catch at boundryline)
MO RIZWAN THAT IS INSANE!!!!!!!!!!!!!!!!! pic.twitter.com/ZwapHK6Zoo
— Cricket on TNT Sports (@cricketontnt) August 15, 2021
हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिज संघाला १६८ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करत असताना ब्लॅकवूडच्या ५५ धावांच्या खेळी व्यतिरिक्त इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. शेवटी केमार रोच आणि जेडन सिल्स यांनी मिळून वेस्ट इंडिज संघाला विजय मिळवून दिला. केमार रोचने या डावात नाबाद ३० तर सिल्सने नाबाद २ धावांची खेळी केली होती. हा सामना वेस्ट इंडिज संघाने १ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह या मालिकेत वेस्ट इंडिजने १-० ने आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडला पराभवाची वाटतेय भिती; अनुभवी खेळाडू म्हणाला, ‘भारताने ५०-६० धावा केल्यास…’
वेस्ट इंडीजचा ‘द्रविड’ म्हणून ओळख असलेला चंद्रपाॅल डोळ्याखाली का लावायचा काळी पट्टी?
बुमराहच्या एकामागून एक वेगवान बाउन्सर्सला त्रासला इंग्लिश क्रिकेटर, मैदानातच ऐकवली खरीखोटी