भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा उडवला. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलची (Morne Morkel) यावर्षी भारतीय क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पण याआधी ते पाकिस्तान संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकही होते. मात्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानची कामगिरी खूपच खराब ठरली. त्यावर बासित अलीने (Basit Ali) खळबळजनक वक्तव्य केले आहे.
मॉर्नी मॉर्केलचा (Morne Morkel) पाकिस्तान संघासोबतचा प्रवास फारसा चांगला नव्हता. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीबद्दल बासित अलीने (Basit Ali) आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, “पाकिस्तानी गोलंदाज स्वतःला क्रिकेटच्या खेळापेक्षा उच्च स्थानावर समजत होते. त्यांना वाटत होते की, त्यांच्यासमोर मॉर्कल काहीच नाही.”
भारत आणि पाकिस्तान संघाच्या रणनीतीतील फरक सांगताना बासित अली (Basit Ali) म्हणाला, “आपल्याला हे फरक माहित असले पाहिजे. हा तोच बांगलादेश संघ आहे, ज्याने कसोटी मालिकेत पाकिस्तानला बॅकफूटवर आणले होते. हा तोच बांगलादेश संघ आहे ज्याने पाकिस्तानला कसोटी मालिकेत पराभूत केले होते. त्याच कसोटी मालिकेत पाकिस्तानला बॅकफूटवर ठेवले होते, पण हे सर्व मानसिकतेवर आणि विचारसरणीवर अवलंबून आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
PAK vs ENG: चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी पाकिस्तानला जोरदार झटका, कोटींचे नुकसान
बांगलादेश ऐवजी यूएईमध्ये का खेळला जातोय महिला टी20 विश्वचषक? जाणून घ्या भारत-पाकिस्तान सामना कधी होणार
मयंक अग्रवालच्या संघानं जिंकली दुलीप ट्रॉफी, फायनलमध्ये ऋतुराजच्या टीमचा पराभव