---Advertisement---

पाकिस्तानचा दुहेरी चेहरा! भारतात खेळण्यास दिला नकार

On: बुधवार, सप्टेंबर 3, 2025 3:16 PM
---Advertisement---

नोव्हेंबर 2025 मध्ये भारतात ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप 2025 ची सुरुवात होणार आहे. मात्र, पाकिस्तानी संघाने यात सहभागी होण्यास नकार दिला आहे. महत्वाची बाब म्हणजे सुरुवातीला त्यांनी होकार दिला होता आणि याबाबत हॉकी इंडिया चे सेक्रेटरी जनरल भोलानाथ सिंह यांनी माहिती दिली होती. त्यांनी स्पष्ट केले होते की पाकिस्तानची टीम भारतात येईल आणि हॉकी वर्ल्ड कप खेळेल. मात्र, आता पाकिस्तानने दुटप्पी भूमिका घेत सहभाग नाकारला आहे.

2025चा हॉकी आशिया कप सध्या सुरू आहे. बिहारच्या राजगीर शहरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानने भारतात येऊन खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे ते आशिया कपमधून बाहेर पडले आणि हे सर्वांसाठी धक्कादायक ठरले. त्यावेळी पाकिस्तानने सुरक्षेला सर्वात मोठे कारण ठरवले होते.

पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष तारिक बुग्ती यांनी आपल्या निवेदनात सांगितले की पाकिस्तानची ज्युनिअर टीम भारतात जाणार नाही. त्यांनी म्हटलं, “पाकिस्तान ज्युनिअर हॉकी टीम वर्ल्ड कपमध्ये भाग घेणार नाही. सध्याच्या परिस्थितीत आम्ही भारतात जाऊ शकत नाही. भारतासोबतचे आमचे तणाव लक्षात घेता भारतात जाणे पूर्णपणे अशक्य होते. दोन्ही बाजूंनी युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. आम्ही आत्ता किंवा भविष्यात भारताची सफर करू शकत नाही. परिस्थिती आत्ताही तशीच आहे आणि जर भारतीय क्रिकेट संघ इथे येऊ शकत नाही, तर पाकिस्तानची हॉकी टीमही भारतात जाणार नाही.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---