---Advertisement---

मोहम्मद आमिरला मिळाला नाही व्हिसा, टी20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानचा संघ अडचणीत!

Mohammad Amir
---Advertisement---

2024 टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानचा संघ टी-20 मालिकेसाठी आयर्लंड आणि इंग्लंडचा दौरा करणार आहे. प्रथम आयर्लंडचा दौरा आहे, जो रविवार, 10 मे पासून सुरू होईल. पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. मात्र या दौऱ्यापूर्वी पाकिस्तानसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. खरं तर, आतापर्यंत संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याला या दौऱ्यासाठी व्हिसा मिळू शकलेला नाही.

टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. अशा स्थितीत संघाच्या या स्टार खेळाडूला व्हिसा न मिळणं पाकिस्तानसाठी नुकसानदायी ठरू शकतं. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलंय की, आमिरला आयर्लंडला जाण्यास विलंब होणार आहे. तो टी-20 मालिकेसाठी पाकिस्तान संघासह आयर्लंडला रवाना होणार नाही.

पाकिस्तानचा संघ उद्या (7 मे) आयर्लंडला रवाना होणार आहे, मात्र आमिर त्यांच्यासोबत जाणार नाही. व्हिसाचा प्रश्न सुटताच आमिर आयर्लंडला रवाना होईल, असं या अहवालात म्हटलं आहे. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, आमिरला आयर्लंडच्या व्हिसाबाबत समस्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2018 च्या आयर्लंड दौऱ्यापूर्वीही त्याला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता.

वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर यानं टी-20 विश्वचषकापूर्वी निवृत्ती मागे घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. तो अलीकडेच न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतही खेळला होता. यानंतर आमिरची आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली. मात्र आता त्याच्या व्हिसाची समस्या उद्भवली आहे.

2010 च्या इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट, वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमिरवर बंदी घालण्यात आली होती. हे तिघेही लॉर्ड्स कसोटीत स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळले होते. यानंतर तिघांनाही क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली.

यानंतर 2015 मध्ये आयसीसीनं आमिरवरील बंदी मुदतपूर्व उठवली होती. त्यानंतर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत पाकिस्तानला 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

टी20 विश्वचषकात दहशतवादी हल्ल्याची धमकी, पंतप्रधानांनी केला धक्कादायक खुलासा

“जर 9व्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल तर खेळूच नको”, हरभजन सिंगचा माहीवर जोरदार हल्लाबोल

एमएस धोनीला ‘बोल्ड’ केल्यानंतर चाहत्यांचा राग अनावर! सोशल मीडियावर हर्षल पटेल द्वेषाचा बळी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---