पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका (Pakistan vs South Africa) संघात कसोटी मालिकेतल दुसरा सामना केपटाऊनमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानी खेळाडू ‘सॅम अयुब’ला (Sam Ayub) गंभीर दुखापत झाली आहे. ही दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला मैदानात उतरण्यासाठी सहकारी खेळाडूंची मदत घ्यावी लागली. यानंतर वैद्यकीय पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याचे अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम फलंदाजी करत आहे. 72 धावसंख्येवर त्यांनी 3 विकेट्स गमावल्या होत्या. या खेळीदरम्यान सॅम अयुब क्षेत्ररक्षण करत होता. दरम्यान 7व्या षटकात तो चेंडूच्या मागे धावला. अयुबची टाच वळली तेव्हा तो सीमारेषेपर्यंत पोहोचला होता. वेदनेने तो लगेच खाली पडला आणि पाय धरून ओरडू लागला.
सॅम अयुबच्या (Sam Ayub) टाचेची दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला चालताही येत नव्हते. त्याला पाठिंबा देऊन मैदानाबाहेर काढले. याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचे फिजिओ त्यांना भेटायला आले होते. परिस्थिती पाहून त्यांनी वैद्यकीय पथकातील इतर सदस्यांना बोलावले. यानंतर त्याला स्ट्रेचरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.
Hope Saim Ayub is okay and that this injury will not be too serious. Our team needs him. 💔.#BabarAzam𓃵 #saimayub #PAKvsSA pic.twitter.com/nzD5NjANik
— C.F.G (@cricketfangir1) January 3, 2025
सर्वप्रथम दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना सेंच्युरियन मैदानावर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात केवळ 14 धावा करून सॅम अयुब बाद झाला. दुसऱ्या डावात 27 धावा करून तो तंबूत परतला. दुसऱ्या डावात त्याने 6 चौकार लगावले होते.
‘सॅम अयुब’च्या (Saim Ayub) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने पाकिस्तानसाठी 7 कसोटी, 9 वनडे आणि 27 टी20 सामने खेळले आहेत. अयुबने 7 कसोटी सामन्यांच्या 14 डावात फलंदाजी करतावा 26च्या सरासरीने 364 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 77 आहे. कसोटीमध्ये 3 अर्धशतकेही झळकावली आहेत. 9 वनडे सामन्यात त्याने 105.53च्या सरासरीने फलंदाजी करताना 515 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सरासरी 64.37 राहिली आहे. वनडेमध्ये त्याने 3 शतकांसह 1 अर्धशतक झळकावले आहे.
सॅम अयुबने टी20 मध्ये पाकिस्तानसाठी 2023 मध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 27 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 137.95च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 498 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 98 आहे. त्याने टी20 मध्ये 1 अर्धशतक देखील झळकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
स्कॉट बोलँडनं मोडला 50 वर्ष जुना विक्रम! अशी कामगिरी करणारा सर्वात वयस्कर गोलंदाज
रोहित शर्माला बसणार आणखी एक धक्का! कसोटी पाठोपाठ वनडेचंही कर्णधारपद जाणार?
IND vs AUS; माजी दिग्गजाने केले सॅम कोन्स्टासचे कौतुक! कारण काय?