पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगले नाव कमावले आहे. यामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्याची गोलंदाजी. आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे तो अनेकवेळा चर्चेत राहिला होता. २७ एप्रिल २००२मध्ये त्याने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये १६१ किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता. त्यावेळी तो इतक्या वेगाने गोलंदाजी करणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज बनला होता.
अख्तरने (Shoaib Akhtar) हा चेंडू न्यूझीलंडच्या क्रेग मॅकमिलनला (Craig McMillan) टाकला होता. परंतु आयसीसीने तांत्रिक कारणामुळे हा विक्रम अधिकृत करण्यास नकार दिला होता.
अख्तरने १६१.३ किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू टाकलेला विक्रम आयसीसीने नाकारला. आयसीसीने म्हटले की, या चेंडूचा वेग त्या उपकरणाद्वारे मोजला गेला, जो आयसीसी मानकांनुसार योग्य मानला जात नाही.
तरीही अख्तर यामुळे निराश झाला नाही. त्याने सलग गोलंदाजी केली आणि शेवटी तो यशस्वी झाला. अख्तरने २००३च्या विश्वचषकादरम्यान इंग्लंडविरुद्ध १६१.३ किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू फेकला होता. हा कारनामा त्याने केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर केला होता.
अख्तरला रावळपिंडी एक्स्प्रेस (Rawalpindi Express) या नावाने ओळखले जाते. तो आपल्या कारकीर्दीदरम्यान वेगाचा बादशाह होता. अख्तरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता ९ वर्षे झाली आहेत. परंतु त्याचा वेगवान गोलंदाजीचा विक्रम आजपर्यंत कोणीही तोडू शकले नाही.
ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली (Brait Lee) आणि शॉन टेटसुद्धा (Shaun Tait) आपल्या काळातील वेगवान गोलंदाज होते. परंतु त्यांना अख्तरचा विक्रम मोडता आले नाही. तरीही क्रिकेट चाहते युवा वेगवान गोलंदाजांकडून अपेक्षा आहे की, ते अख्तरचा हा विक्रम मोडतील.
ट्रेंडिंग लेख-
–त्या दिवशी सचिनने मुंबईच्या लोकलने केला होता शेवटचा प्रवास
-बड्डे बाॅय आशिष नेहराची क्रिकेट कारकिर्द अशी राहिली
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा