पाकिस्तान क्रिकेट संघ काही दिवसांपासून खूप खराब कामगिरी करत आहे. शेवटच्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानला सुपर-8 मध्ये देखील स्थान मिळवता आले नव्हते, तर आता बांगलादेशविरूद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. तत्पूर्वी पाकिस्तान संघासाठी आनंदाची बातमी ही आहे की, स्टार फलंदाज बाबर आझमने (Babar Azam) फाॅर्ममध्ये परतण्याचा इशारा दिला आहे.
वास्तविक, पाकिस्तानमध्ये सध्या चॅम्पियन्स वनडे कप खेळला जात आहे. बाबर आझम (Babar Azam) या स्पर्धेत स्टॅलियन्सकडून खेळत आहे. बाबरने आपल्या संघाकडून खेळताना लायन्सविरुद्ध आपल्या फलंदाजीची चमक दाखवली. खराब फॉर्मशी झुंजत असलेला बाबर लायन्सविरुद्ध शानदार फलंदाजीसह फॉर्ममध्ये परतला.
बाबर आझमने (Babar Azam) लायन्सविरुद्ध 79 चेंडूंत 76 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. दरम्यान त्याने 9 चौकार लगावले. त्याने मैदानाच्या प्रत्येक बाजूला अनेक शॉट्स खेळले. बाबरच्या फलंदाजीवर चाहतेही बेधुंदपणे नाचताना दिसले. बाबर अखेर फॉर्ममध्ये परतल्याने चाहते खूप खूश दिसत होते.
पाकिस्तान संघ पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी बाबरचे फाॅर्ममध्ये परतणे ही पाकिस्तानसाठी आनंदाची बातमी आहे. बाबरचा फॉर्म असाच सुरू राहिल्यास तो इंग्लंडच्या गोलंदाजांवर भारी पडेल.
शेवटच्या काही दिवसात बाबर आझम (Babar Azam) त्याच्या खराब फाॅर्मशी झुंज देत होता. त्याच्या खराब कामगिरीमुळे तो सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला. चाहत्यांनी त्याला सोडले नाही. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी बाबरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा देखील सल्ला दिला होता. पण आता बाबरच्या 76 धावांच्या खेळीने पुनरागमन केले आहे. परंतु बाबर त्याचा फाॅर्म कायम ठेवू शकेल का? हे पाहणंदेखील महत्वाचं ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमारचा तरुणांना ‘गुरुमंत्र’; अंडर 19 टीमला मार्गदर्शन करताना म्हणाला, “निकालाची चिंता…”
“माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय आहेस तू”, वाढदिवशी पत्नी देविशाकडून सूर्यकुमारला प्रेमळ शुभेच्छा
VIDEO: 140 किलो वजनाच्या ‘या’ खेळाडूची क्षेत्ररक्षणामध्ये कमाल