पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानी स्वतः एका मुलाखतीत हे सांगितले आहे. हसन अली म्हणाला एक दिवस आयपीएल खेळण्याची माझी इच्छा आहे.
एका शो दरम्यान बोलताना हसन अली (Hasan Ali) म्हणाला, “प्रत्येक खेळाडूला आयपीएल खेळायची आहे आणि मलाही त्या लीगमध्ये खेळायचे आहे. ती जगातील सर्वात मोठ्या लीगपैकी एक आहे. भविष्यात मला संधी मिळाली तर मी तिथे नक्कीच खेळेन.”
आयपीएलच्या पहिल्या हंगामात पाकिस्तानचे अनेक खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये शोएब मलिक, शोएब अख्तर, कामरान अकमल, सोहेल तन्वीर आणि शाहिद आफ्रिदीसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. 2008 च्या या मोसमात पाकिस्तानी खेळाडूंनी खूप धमाल केली होती. सोहेल तन्वीरने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या आणि तो पर्पल कॅपचा विजेता होता. मात्र, या हंगामानंतर पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएल खेळण्यास बंदी घालण्यात आली होती.
नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग उघड झाल्यानंतर भारताने शेजारी देशासोबतचे सर्व संबंध संपवले.
त्यानंतर पाकिस्तानसोबतच्या चर्चेपासून ते व्यापारापर्यंत सर्व काही जवळपास संपले होते.आयपीएलमध्येही पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्यास विरोध करण्यात आला, त्यानंतर आयपीएल समितीला पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आयपीएल खेळण्यावर बंदी घालावी लागली होती. तेव्हापासून आतापर्यंत पाकिस्तानी खेळाडूंनी आयपीएलमध्ये भाग घेतलेला नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या पाकिस्तान कसोटी संघात हसन अलीचा समावेश करण्यात आला आहे. 30 नोव्हेंबरला तो ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. सध्या तो पाकिस्तान संघाच्या सराव शिबिरात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी हे शिबिर सुरू आहे. (Pakistan’s this fast bowler wants to play IPL Said In the future I)
महत्वाच्या बातम्या
IPL 2024: गुजरात टायटन्सचा कर्णधार बनताच शुबमन गिलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘इतक्या चांगल्या…’
IPL ब्रेकिंग! पंड्या मुंबईकडे जाताच Gujarat Titansचे कर्णधारपद ‘या’ पठ्ठ्याकडे, उंचावतील तुमच्याही भुवया