पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सईद अजमलने सहा वर्षांपूर्वी २०११ च्या विश्वचषक उपांत्यफेरीत झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सचिन तेंडुलकरला नाबाद देण्याच्या निर्णयावर शंका व्यक्त केली आहे. सचिनला या सामन्यात डीआरएसमध्ये नाबाद देण्यात आले होते.
या सामन्यातील ११व्या षटकातील चौथ्या चेंडुवर अजमलच्याच गोलंदाजीवर सचिनला २३ धावांवर असताना पायचीत बाद देण्यात आले होते परंतु सचिनने रिव्हु घेतल्यानंतर त्याला नाबाद असल्याचा निर्णय देण्यात आला होता. याबद्दलच अजमलने प्रश्न विचारला आहे.
या सामन्यादरम्यान सचिनला अजमल विरुद्ध खेळण्यास संघर्ष करावा लागत होता. सामन्यात सचिनने ८५ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. तसेच अखेर अजमलनेच त्याला बाद केले होते. या सामन्यासाठी सामनावीराचा पुरस्कारही सचिनलाच देण्यात आला होता.
याबरोबरच अजमल भारतीय फलंदाजांबदल म्हणाला, “तेंडुलकर आणि सहकार्यांविरुद्ध गोलंदाजी करणे म्हणजे कौशल्यांची परीक्षा होती”
काल सईद अजमलने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. त्याने आत्तापर्यंत ३५ कसोटी सामन्यात १७८ बळी घेतले आहेत तर ११३ वनडे सामन्यात १८४ बळी घेतले आहेत.
२०११ हे वर्ष त्याच्यासाठी सर्वात यशस्वी वर्ष होते. तो यावर्षात कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू ठरला होता. त्याने ८ कसोटी सामन्यात ५० बळी घेतले होते.
https://www.youtube.com/watch?v=9K-3VvXRGUI