तीन वेळा ‘वर्ल्ड क्रिकेट अंपायर ऑफ द इयर पुरस्कार’ जिंकणारे पाकिस्तानचे दिग्गज पंच अलीम दार (Aleem Dar) यांनी शुक्रवारी (27 सप्टेंबर) निवृत्ती जाहीर केली आहे. पाकिस्तानच्या देशांतर्गत हंगामानंतर 2025 मध्ये निवृत्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 2003 ते 2023 या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये त्यांचा समावेश होता. ते सध्या पाकिस्तानच्या एलिट पॅनेलमध्ये आहेत आणि आयसीसी आंतरराष्ट्रीय पॅनेलमधील पाकिस्तानच्या चार पंचांपैकी एक आहेत.
निवृत्तीची घोषणा केल्यानंतर झाले भावूक
निवृत्तीच्या निर्णयाविषयी माहिती देताना दार म्हणाले, “प्रत्येक अद्भुत प्रवास शेवटी संपतो आणि आता माझ्या सामाजिक आणि परोपकारी कार्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे.” 1986-98 पासून 17 प्रथम श्रेणी सामने आणि 18 लिस्ट ए सामने खेळले. यादरम्यान त्यांनी प्रथम श्रेणीत 270 धावा आणि 11 विकेट्स घेतल्या होत्या. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 179 धावा आणि 15 विकेट्स घेतल्या होत्या. देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर दार यांनी 1999 मध्ये पाकिस्तानच्या घरगुती स्पर्धेत कायद-ए-आझम ट्रॉफीमध्ये प्रथम श्रेणीद्वारे पंच म्हणून पदार्पण केले होते.
One of the world’s most respected umpires and three-time winner of David Shepherd Trophy for ICC Umpire of the Year, Aleem Dar will retire at the end of the PCB’s 2024-25 season, concluding a glorious career ✨
More details ➡️ https://t.co/fqlpI7yp2g pic.twitter.com/vaePoSRvoa
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 27, 2024
सहकाऱ्यांचे आभार मानले
यावेळी दार यांनी सहकाऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले, “माझे सहकारी आणि सहकाऱ्यांच्या अतुलनीय पाठिंब्याने पंचगिरीमधील माझ्या जवळपास सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण केल्यामुळे, मला वाटते की बाजूला पडून नवोदित पंचांना चमकण्याची संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे. मला आशा आहे की त्यांनाही क्रिकेटच्या महान खेळात आपली छाप सोडण्याची आणि पाकिस्तानचे अभिमानाने प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.”
दार यांची पंचगिरीची कारकीर्द
दार यांनी आतापर्यंत 145 कसोटी, 231 वनडे, 72 टी20, पाच महिला टी20, 181 प्रथम श्रेणी सामने आणि 282 लिस्ट-ए सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय कसोटी संघात सर्वाधिक क्रिकेटपटू कोणत्या राज्याचे आहेत?
यष्टीरक्षक पंतचा सल्ला आला कामी, बांगलादेशच्या कर्णधाराला अश्विनने असे फसवले जाळ्यात
BGT 2024-25; भारताला घाबरला ऑस्ट्रेलिया? स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य!