---Advertisement---

पाच नाही; सहा नाही, तब्बल 10 देशांत कसोटी शतके करणारे जगातील 2 फलंदाज

On: मंगळवार, नोव्हेंबर 29, 2022 10:51 AM
---Advertisement---

कसोटी क्रिकेटमध्ये आजपर्यंत आयसीसी वर्ल्ड 11 या संघासह एकूण 13 संघांनी एकतरी कसोटी सामना खेळला आहे. तर युएईसह एकूण 12 देशांच्या भूमीवर कसोटी सामने खेळवले गेले आहे. युएई हे पाकिस्तान संघाचे सध्याचे होम ग्राऊंड असल्याने त्यांचे कसोटी सामने तेथे होतात. तर आयर्लंड व अफगाणिस्तान हे देश नव्यानेच कसोटी मान्यता मिळाल्यामुळे कसोटी खेळणारे देश आहेत.

यातील अफगाणिस्तानचे मायदेशातील कसोटी सामने हे आधी भारतात होत होते, आता त्यांच्या क्रिकेट बोर्डने संयुक्त अरब अमिरातीसोबत 5 वर्षांचा करार केला आहे. ज्यामुळे युएई हे त्यांचे पुढील पाच वर्षांसाठी होम ग्राऊंड असणार आहे, तर आयर्लंडने आपल्या देशात एक कसोटी सामना खेळला आहे.

जर आपण कसोटीत खेळणाऱ्या जुन्या मुख्य 10 देशांबद्दल बोललो तर या प्रत्येक देशाच्या भूमीवर शतक करणारे केवळ दोन कसोटीपटू आजपर्यंत झाले आहेत.

2. राहुल द्रविड- 

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने कसोटीत 36 शतके केली असून कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो 5वा आहे. एकेकाळी त्याच्या नावावर एक खास विक्रम होता, ज्याची सतत चर्चा व्हायची. तो विक्रम म्हणजे कसोटीत 10 देशांत शतकी खेळी करणारा एकमेव खेळाडू.

द्रविडने कसोटी खेळणाऱ्या प्रमुख 10 देशांपैकी 10 देशांच्या भूमीवर दमदार शतकी खेळी केल्या आहेत. अगदी सचिन तेंडूलकर यालाही हा विक्रम करता आलेला नाही. 4 कसोटी सामने खेळूनही सचिनला झिम्बाब्वे देशात शतकी खेळी करता आलेली नाही. सचिन नाही तर जॅक कॅलिस, कुमार संगकारा, रिकी पाॅटींग, सुनिल गावसकर, ब्रायन लारा किंवा माहेला जयवर्धने यांनाही हा कारमाना करता आलेला नाही.

1. युनूस खान-

पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खान याने कसोटी खेळणाऱ्या या 10 देशांत शतकी खेळी केलीच आहे परंतु त्याने युएईमध्येही शतकी खेळी केली आहे. अशाप्रकारे 10 देशांत शतकी खेळी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.

कसोटी कारकिर्दीत 34 शतके करणाऱ्या युनूसने 11 वेगवेगळ्या देशांत हा कारनामा केलाय हे विशेषच. 118 कसोटी खेळलेल्या युनूसने अगदी 116व्या कसोटीत ऑस्ट्रेलियात कसोटी शतक करत 11 देशांत शतके करण्याचा कारनामा केला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोनाल्डो नाहीतर ब्रुनो पोर्तुगलचा सर्वोत्तम खेळाडू! फर्नांडिसच्या दोन गोलमुळे संघ वर्ल्डकपच्या अंतिम 16मध्ये
‘मला नोकरासारखी वागणूक द्यायचे…’, वसीम अक्रमकडून दिग्गजावर मोठे आरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---