पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAKvsENG) यांच्यात सात सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. पाकिस्तान यजमान असलेल्या या मालिकेतील दोन सामने खेळले गेले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. यातील दुसरा सामना गुरूवारी (22 सप्टेंबर) खेळला गेला. हा सामना पाकिस्तानने 10 विकेट्सने जिंकला. यामध्ये पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी तुफानी खेळी केली. त्यांच्या या खेळीचे सर्वत्र कौतुक होत असताना शाहीन शाह आफ्रिदी याने या दोघांना स्वार्थी म्हटले आहे.
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 199 धावसंख्या उभारली. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने नाबाद शतकी खेळी केली. त्याचबरोबर विकेटकीपर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यानेही नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला सहज विजय मिळवून दिला आहे. त्याच्या या खेळीबाबत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) याने ट्वीट केले, जे चांगलेच व्हायरल झाले आहे.
आफ्रिदीने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले, “कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्यापासून आता सुटका करून घेण्याची वेळ आली आहे. किती स्वार्थी खेळाडू आहेत. जर योग्य खेळले असते तर सामना 15 षटकांतच संपला असता. शेवटच्या षटकापर्यंत नेण्याची काहीही आवश्यकता नव्हती. चला आपण ही आठवणीत राहिल असा क्षण बनवूया. नाही का? या पाकिस्तानच्या संघावर खरचं खूप अभिमान आहे.”
https://twitter.com/iShaheenAfridi/status/1573011176086200326?s=20&t=btCNaqa3qZC0_ohxgpzu_w
मागील काही सामन्यात बाबर आणि रिझवान हे संथ गतीने खेळत असल्याने ते टीकाकराचे लक्ष्य ठरले होते. आशिया चषक 2022च्या स्पर्धेत बाबरचा फॉर्म पाकिस्तानसाठी काळजीचा मुद्दा ठरला होता. मात्र या दोघांनी ज्याप्रकारे इंग्लंड विरुद्ध फलंदाजी केली ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
विजयासाठी मैदानात उतरलेल्या बाबरने 66 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या साहाय्याने नाबाद 110 धावा केल्या. रिझावननेही 51 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 88 धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या टेंशनमध्ये वाढ, मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धही नाही खेळणार?
‘आयपीएल खेळण्याचा अनुभव कामी आला’, भारताला पराभूत करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे चकित करणारे विधान
‘हो चिंटिंग केलेली…’, शाहिद आफ्रिदीने 17 वर्षांनंतर मान्य केली ‘ती’ चूक