क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये आज ‘अ’ गटातील शेवटची लढत पालघर काझीरंगा रहिनोस विरुद्ध सांगली सिंध सोनिक्स यांच्यात झाली. दोन्ही संघ टॉप 4 मधून बाहेर पडल्याने सामना फक्त औपचारिक होता. दोन्ही संघाला रेलिगेशन फेरीत खेळवा लागणार होता.
सामन्याच्या सुरुवातीलाचा पालघरच्या राज साळुंखे ने सुपर रेड करत आक्रमक सुरुवात केली. राज साळुंखेने पहिल्या दहा मिनिटामध्ये सुपर टेन करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. मध्यंतरा पर्यत 34-10 अशी आघाडी पालघर काझीरंगा रहिनोस संघाने मिळवली.
पालघर संघाने आक्रमक खेळ सुरू ठेवत 73-19 असा एकतर्फी सामना जिंकला. पालघर संघाकडून राज साळुंखेने चढाईत सर्वाधिक 25 गुण मिळवले तर पियुष पाटील ने अष्टपैलू खेळ करत चढाईत 3 गुण तर पकडीत 7 पकडी केल्या. हर्ष मेहेर ने 6 व ऋषिकेश दळवी ने 6 पकडी करत हाय फाय केला. सांगली कडून वृषभ साळुंखेने चांगला खेळ केला.
बेस्ट रेडर- राज साळुंखे, पालघर काझीरंगा रहिनोस
बेस्ट डिफेंडर- पियुष पाटील, पालघर काझीरंगा रहिनोस
कबड्डी का कमाल- ऋषिकेश दळवी, पालघर काझीरंगा रहिनोस
(Palghar Kaziranga Rhinos defeated Sangli Sindh Sonics)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कित्येक अफगाणी आयपीएल खेळले, पण ‘ही’ कामगिरी फक्त गुरबाजलाच जमली, तुम्हीही कराल कौतुक
स्टार फलंदाजाला समजली अश्विनची ताकद, कॅरम बॉलने ऑफ स्टंप्स थेट उडवला