रेलीगेशन फेरीच्या सहाव्या दिवसाची पहिली लढत अंत्यत महत्वपूर्ण होती. पालघर काझीरंगा रहिनोस विरुद्ध रत्नागिरी अरावली ॲरोज यांच्यात लढत होती. पालघर दुसऱ्या तर रत्नागिरी तिसऱ्या स्थानी होता. पालघर संघाने आक्रमक सुरुवात करत रत्नागिरी संघावर दोन लोन पाडत आघाडी मिळवली.
पालघर संघाकडून राहुल सवर, राज साळुंखे व पियुष पाटील यांनी एकत्रित खेळ करत संघाला आघाडी मिळवून दिली. पालघर संघाने मध्यांतरला 27-09 अशी आघाडी होती. मध्यांतरा नंतर ही पालघर संघाने आक्रमक खेळ सुरू ठेवत आघाडी भक्कम केली. राहुल
सवर च्या सुपर टेन करत आपली छाप पाडली.
पालघर काझीरंगा रहिनोस संघाने 48-29 असा सामना जिंकत प्ले-ऑफस मध्ये आपले स्थान निश्चित केले. पालघर कडून चढाईत राहुल सवर ने 13, राज साळुंखे ने 12 तर पियुष पाटील ने 8 गुण मिळवले. पकडी मध्ये हर्ष मेहेर व सर्वेश फटकारे ने प्रत्येकी 3 गुण मिळवले. रत्नागिरी कडून पारस पाटील ने 10 गुण तर भूषण गुढेकर कर 4 पकडी केल्या.
बेस्ट रेडर- राहुल सवर, पालघर काझीरंगा रहिनोस
बेस्ट डिफेंडर्स- भूषण गुढेकर, रत्नागिरी अरावली ॲरोज
कबड्डी का कमाल- पियुष पाटील, पालघर काझीरंगा रहिनोस
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रेलीगेशन फेरीमध्ये रायगड मराठा मार्वेल्स, पालघर काझीरंगा रहिनोस संघाचा चौथा विजय
जेवणासाठी तिलक वर्माच्या घरी पोहोचला मुंबईचा आख्खा संघ! स्वतः सचिननही होता उपस्थित