पंढरपूर: ‘हौसेला मोल नाही’, हे वाक्य आपणा सर्वांना परिचित असावे. हौस पुरवण्यासाठी कित्येकांनी वेगवेगळी शक्कल लढवली असल्याची बरीचशी उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र मुलाच्या क्रिकेटच्या हौसेसाठी त्याच्या बापाने आपले उत्पन्नाचे साधन असलेले शेत उपसल्याचे ऐकल्यास अनेकांच्या भुवया उंचावतील. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात असे काही घडणे कदाचित शक्य आहे आणि वास्तवात असे झालेसुद्धा आहे. होय. अगदी बरोबर वाचलंत. असे वास्तवास झाले आहे.
कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेमुळे भारतातील खेडेगावांपासून ते शहरांपर्यंत सर्वत्र लॉकडाऊनचा नियम काठेकोरपणे पाळला जात आहे. याचा फटका स्थानिक आणि देशांतर्गत क्रिकेट पातळीवरील अनेक क्रिकेट स्पर्धांना बसला आहे. अशात या रिकाम्या वेळेत आपल्या मुलाचे क्रिकेट प्रशिक्षणही बंद झाल्याचे पाहून पंढरपूर तालुक्यातील अनवली गावचे रहिवासी बाळासाहेब सूर्यवंशी यांनी चक्क आपली ५ एकरावरील द्राक्षाची बाग उपसली आहे आणि त्यावर क्रिकेटचे मैदान उभारले आहे.
त्यांचा मुलगा अभिनय सूर्यवंशी हा वयोगटातील वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळला आहे. तो नंदुरबार जिल्ह्यातील १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत खेळला आहे. याबरोबरच पुण्यातील २ वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याने प्रतिनिधित्व केले आहे. एका स्पर्धेत तो संघाचा कर्णधारही राहिला आहे आणि पठ्ठ्याने दोन्हीही स्पर्धाही जिंकल्या आहेत.
आपल्या लेकामध्ये अफाट प्रतिभा असल्याने त्याला प्रोत्साहन देण्याचे काम सूर्यवंशी यांनी केले आहे. त्यांनी आपल्या ५ एकर जमिनीवर पसरलेल्या द्राक्षाची बाग काढून राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारण्यास सुरुवात केली आहे.
शेतजमिनीला क्रिकेटच्या मैदानात रुपांतरित करण्यासाठी त्यांनी १०० बाय ५० मध्ये २ फूट खड्डा पाडला. त्यामध्ये दगड, वाळू, विटा, नदीतील मरुळ माती भरली आणि मैदान उभारले आहे. यासाठी जवळपास ५० माणसांना त्यांना कामावर ठेवले आहे. अगदी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचे पिच क्यूरटेरही इथे येऊन गेले असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. एबीपी माझाने घेतलेल्या खास मुलाखतीत ठेकेदार सूर्यवंशी यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
गरमागरमी! भर सामन्यात भिडले बांगलादेश आणि श्रीलंकाचे खेळाडू, रंगले शाब्दिक युद्ध
दुर्दैवच म्हणावे! WTC फायनलमध्ये ‘हा’ अंपायर भारतासाठी अनलकी, यापुर्वी ४ विश्वचषकात नडलाय
लईच ताणलं! ३ महान क्रिकेटपटू, ज्यांनी अनावश्यक आपली कसोटी कारकीर्द खेचली