जगातील सर्वात मोठ्या टी२० लीगच्या चषकावर नाव कोरण्यासाठी आसुसलेला पंजाब किंग्स संघ यंदा नव्या जोशात असल्याचे पाहायला मिळत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाची सुरुवात होण्यापुर्वी संघाच्या नावासह लोगोही त्यांनी बदलला आहे. चेन्नईत गुरुवारी (१८ फेब्रुवारी) पार पडलेल्या आयपीएल लिलावातही हा संघ खास रणनितीसह दिसला. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा संघ मालकीन असलेल्या या संघाने लिलावात एकूण ९ खेळाडूंना खरेदी केले.
त्यातही श्रेयस्कर फलंदाजात गणल्या जाणाऱ्या विराट कोहलीला बाद करणारा झाय रिचर्डसन पंजाबची सर्वोत्कृष्ट बोली ठरला. रिचर्डसनसाठी दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसोबत स्पर्धा सुरू असताना पंजाबने १४ कोटींची बोली लावत बाजी मारली. सोबत रिले मेरेडिथ, डेविड मलान, मोझेस हेन्रिक्स आणि फॅबियन ऍलन या परदेशी खेळाडूंना त्यांनी ताफ्यात घेतले.
याशिवाय पंजाबने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ च्या विजेत्या संघाचा युवा फलंदाज शाहरुख खानसाठी ५ कोटी २५ लाख खरेदी केले. सोबतच जलज सक्सेना, सौरव कुमार आणि उत्कर्ष सिंग या नवख्या खेळाडूंनाही त्यांनी संघात संधी दिली.
मागील १३ हंगामापासून आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पाहणारा पंजाब संघ या खेळाडूंच्या खरेदीसह अजून मजबूत बनला आहे. संघनायक केएल राहुलच्या नेतृत्त्वाखाली यंदा विजेतेपद जिंकण्यासाठी ते झगडताना दिसतील.
Presenting #SaddaSquad for the season! ????????
Khush ho tussi❓????#SaddaPunjab #PunjabKings #IPLAuction2021 pic.twitter.com/9sxgNsq0zu
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) February 18, 2021
पंजाब किंग्स – २५ खेळाडू (८ परदेशी)
लिलावाआधी संघात कायम असलेले खेळाडू –
केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंग, सरफराज खान, दीपक हूडा, प्रभसिमरण सिंग, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल.
लिलावात खरेदी केलेले खेळाडू –
झाय रिचर्डसन(१४ कोटी), रिले मेरेडिथ(८ कोटी), शाहरुख खान(५.२५ कोटी), मॉझेस हेन्रिक्स(४.२० कोटी), डेव्हिड मालान(१.५० कोटी), फाबियन ऍलेन(७५ कोटी), जलज सक्सेना(३० लाख), सौरव कुमार(२० लाख), उत्कर्ष सिंग(२० लाख).
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या प्रत्येक हंगामात ‘या’ खेळाडूंची झाली चांदी, फ्रँचायझींनी ओतला पाण्यासारखा पैसा






