पुणे। बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ पुरुष स्नूकर गटात पंकज अडवानी, लक्ष्मण रावत, आदित्य मेहता, पुष्पेंदर सिंग या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत 23वेळा जागतिक विजेतेपद पटकावणाऱ्या पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या पंकज अडवानी याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत तेलंगणाच्या हिमांशू जैनचा(5-0){74(55)-26, 72-32, 58-44, 120(87)-08, 94(81)-32} असा एकतर्फी पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली.
पीएसपीबीच्या आदित्य मेहता याने दिल्लीच्या वरून मदनचा (5-2){59-47, 65(59)-12, 36-78(55), 88-31, 65-16, 01-119(92), 94(53)-12} असा पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या झालेल्या लढतीत आरएसपीबीच्या पुष्पेंदर सिंग याने नीरज कुमारचा (5-4){06-71(63), 93(73)-00, 02-72, 83-00, 45-49, 75-09, 58-37, 37-61, 73-16}असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. पीएसपीबीच्या लक्ष्मण रावत याने ध्वज हरियाचा (5-3){75-25, 72-26, 15-75, 45-86, 46-66, 56-39, 64-35, 62-09}असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
वरिष्ठ स्नूकर महिला गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत तामिळनाडूच्या अनुपमा रामचंद्रन याने कर्नाटकाच्या उमादेवीचा (2-0){ 49-36, 56-35 } असा तर,कर्नाटकाच्या वर्षा संजीव याने महाराष्ट्राच्या नीता संघवीचा (2-1) { 35-56, 64-10, 42-13}असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल।
वरिष्ठ स्नूकर पुरुष।
उपांत्यपूर्व फेरी।
पंकज अडवानी(पीएसपीबी)वि.वि.हिमांशू जैन(तेलंगणा)(5-0){74(55)-26, 72-32, 58-44, 120(87)-08, 94(81)-32 }
आदित्य मेहता(पीएसपीबी)वि.वि.वरून मदन(दिल्ली)(5-2){59-47, 65(59)-12, 36-78(55), 88-31, 65-16, 01-119(92), 94(53)-12 }
लक्ष्मण रावत(पीएसपीबी)वि.वि.ध्वज हरिया(पीएसपीबी)(5-3){75-25, 72-26, 15-75, 45-86, 46-66, 56-39, 64-35, 62-09 }
पुष्पेंदर सिंग(आरएसपीबी)वि.वि.नीरज कुमार(आरएसपीबी)(5-4){06-71(63), 93(73)-00, 02-72, 83-00, 45-49, 75-09, 58-37, 37-61, 73-16}
वरिष्ठ स्नूकर महिला।
उप-उपांत्यपूर्व फेरी।
सुनीती दमानी(पश्चिम बंगाल)वि.वि.इशिका शहा(मध्यप्रदेश)(2-0){64-12, 69-36 }
अमी कमानी(मध्यप्रदेश)वि.वि.रेणू भरकतीया(मध्यप्रदेश)(2-0){78-31, 81-18 }
चित्रा एम.(कर्नाटक)वि.वि.नीता कोठारी(पश्चिम बंगाल)(2-0){68(32)-02, 88(53)-16 }
अनुपमा रामचंद्रन(तामिळनाडू)वि.वि.उमादेवी(कर्नाटक)(2-0){ 49-36, 56-35 }
वर्षा संजीव(कर्नाटक)वि.वि.नीता संघवी(महाराष्ट्र)(2-1) { 35-56, 64-10, 42-13 }
किरथ भंडाल(दिल्ली)वि.वि.इंदिरा गौडा(कर्नाटक)(2-0) { 60-26, 64-43 }
अरांता सॅचेस(महाराष्ट्र)वि.वि.कीर्थना पी(कर्नाटक)(2-0) { 56-48, 69-39 }
विद्या पिल्लई(कर्नाटक)वि.वि.आन्या पटेल(गुजरात)(2-0){ 80(34)-11, 70-37 }