मुंबई। रोहतक- हरियाणा येथे दि. १३ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या “४६व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आपले दोन्ही संघ जाहीर केले. बीडच्या वैभव गर्जेकडे कुमार, तर पुण्याच्या मानसी रोडेकडे कुमारी गटाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. कुमार गटात विजेत्या ठाण्याचे उपविजेत्या रत्नागिरीचे २-२ खेळाडू या संघात निवडण्यात आले आहेत. कुमारी गटातील विजेत्या पुण्याचे तीन, उपविजेत्या बीड व मुंबई उपनगरच्या प्रत्येकी २-२ खेळाडूंची या संघात वर्णी लागली आहे.
नंदादीप शाळेच्या मैदानावर या दोन्ही संघाचा जोरदार सुरू आहे. महाराष्ट्राचे हे संघ मंगळ. दि. ११फेब्रुवारी रोजी सायं. ७-००वा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथून स्पर्धेकरिता रोहतक-हरियाणा येथे रवाना होतील. आज गोरेगाव-मुंबई येथील नंदादीप शाळेच्या मैदानावर मुंबई उपनगर कबड्डी असो. अध्यक्ष अमोल कीर्तिकर, उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, राज्य संघटनेचे सह कार्यवाह रविंद्र देसाई, सचिन भोसले, रमेश हरयाण यांच्या उपस्थितीत राज्य संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांच्या संमतीने कोषाध्यक्ष मंगल पांडे यांनी हे दोन्ही संघ प्रसार माध्यमाकरिता जाहीर केले. संघ खालीलप्रमाणे.
कुमार गटाचा संघ :- .१) वैभव गर्जे – बीड (संघनायक), २)तेजस पाटील – कोल्हापूर (उपसंघनायक), ३)परेश हारड – ठाणे, ४)आकाश शिंदे – नाशिक, ५)विघ्नेश पवार – मुंबई उपनगर, ६)हर्ष लाड – मुंबई शहर, ७)प्रथमेश निघोट – पुणे, ८)विवेक जांभळे – रत्नागिरी, ९)गौरव पाटील – ठाणे, १०)प्रतीक चव्हाण – रत्नागिरी, ११)रोहित बिन्नीवाले – जालना, १२)कृष्णा राठोड – औरंगाबाद.
प्रशिक्षक :- डॉ. केतन गायकवाड – बीड, व्यवस्थापक :- रविकिरण देशमुख – बीड.
कुमारी गटाचा संघ :- १)मानसी रोडे (संघनायिका), २)समृद्धी कोळेकर, ३)दिव्या गोगावले (तिन्ही पुणे), ४)आरती नांगरे, ५)शीतल मेहेत्रे (दोन्ही बीड), ६)सुवर्णा लोखंडे – औरंगाबाद, ७)मृणाल टोणपे – कोल्हापूर, ८)प्रतीक्षा तांडेल – मुंबई शहर, ९)काजल खैरे (उपसंघनायिका) – मुंबई उपनगर, १०)हर्षा शेट्टी – पालघर, ११)सविता शिंदे – अहमदनगर, १२)हरजितकौर संधू – मुंबई उपनगर.
प्रशिक्षिका :- शीतल मारणे – जाधव. व्यवस्थापिका :- राजश्री बंडागळे – मुंबई उपनगर.