धरमशाला । येथे सुरु असलेल्या हिमाचल प्रदेश विरुद्ध गोवा यांच्यातील रणजी सामन्यात पंकज जैसवाल या खेळाडूने १६ चेंडूत अर्धशतक केले आहे.
जेव्हा हिमाचल प्रदेशने आपला डाव ७ बाद ६२५ धावांवर घोषित केला तेव्हा जैसवाल २० चेंडूत ६३ धावांवर खेळत होता. त्याने आपल्या ६३ धावांच्या खेळीत ७ षटकार आणि ४ चौकार खेचले.
रणजी स्पर्धेतील माहित असणाऱ्या खेळींपैकी ही दुसरी सर्वाधिक वेगवान अर्धशतकी खेळी आहे. यापूर्वी बंदीप सिंगने १५ चेंडूत अर्धशतकी केली होती.
याआधीच्याच सामन्यात याच मैदानावर हिमाचल प्रदेशाकडून प्रशांत चोप्रा या खेळाडूने ३०० धावांची खेळी केली होती.
रणजी स्पर्धेतील वेगवान अर्धशतकी खेळी
१५- बंदीप सिंग
१६- पंकज जैसवाल
१८- शक्ती सिंग, युसूफ पठाण
२०- विनोद कांबळी