भारताच्या कसोटी संघाचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीने तो कसोटी सामन्यात वेगळाच रंग भरताना दिसतोय. तसेच, यष्टीरक्षण करताना तो सतत काहीतरी मजेशीर बोलत असतो. अहमदाबाद येथे संपलेल्या भारत आणि इंग्लंडमधील दिवस-रात्र कसोटीतही अशाच प्रकारे पंचांसोबत मजामस्ती करतानाचा पंतचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
स्टंपमागून कॉमेंट्रीसाठी प्रसिद्ध आहे पंत
आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणापासूनच पंत स्टंपमागून सतत काहीतरी मजेशीर बोलताना दिसून येतो. २०१८-२०१९ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन याच्यासोबत झालेले ‘बेबी सिटिंग’ प्रकरण चांगलेच गाजले होते. २०२०-२०२१ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर देखील तो भारतीय खेळाडूंनाच वेगवेगळ्या पद्धतीने टिप्पण्या करत प्रोत्साहित करत होता. यासोबतच, तो वेगवेगळी गाणी देखील मैदानावर म्हणत असतो.
पंचांची केली मस्करी
दरवेळी प्रतिस्पर्धी किंवा आपल्याच संघसहकार्यांसोबत मस्ती करणाऱ्या पंतने अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चक्क पंच अनिल चौधरी यांची मस्करी केली. इंग्लंड संघाच्या दुसर्या डावात एकविसाव्या षटकादरम्यान स्टंपवरील बेल्स खाली पडल्यानंतर पंत ती बेल्स पुन्हा लावत होता. खरे तर हे काम पंचांचे असते. मात्र, पंत बेल्स लावत असताना अनिल चौधरी त्याला निर्देश देत होते. बेल्स पूर्ववत केल्यानंतर, पंत चौधरी यांच्याकडे पाहत म्हणाला, “पैसे दो मेरे”. पंतच्या या चेष्टेनंतर सर्व खेळाडू हसू लागले.
https://twitter.com/ritesht82464999/status/1365250447213088771
https://twitter.com/Adi_Rukhster06/status/1364914777357570049
Pant to Anil Chaudhary after fixing the bails – 'Paise do mere' 🤣🤣🤣🤣 #INDvENG #RishabhPant
— Anurag Mallick (@anuragmallick51) February 25, 2021
Rishabh Pant to Anil Choudhary – " Mere paise do " after putting the dislodged bails 😂
This guy is special .#INDvENG— Mirchi 🌶️ (@MightyMood9) February 25, 2021
भारताने जिंकली तिसरी कसोटी
अहमदाबाद कसोटीत रिषभ पंतची बॅट शांत राहिली. हा डाव्या हाताचा स्फोटक फलंदाज अवघी एक धाव काढून जो रूटच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पंत मोठ्या धावा काढण्यात अपयशी ठरला तरी भारताने हा सामना आरामात जिंकला. इंग्लंडने पहिल्या डावात ११२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ देखील १४५ धावांवर बाद झाला. अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांच्या फिरकी फिरकीपुढे इंग्लंडने दुसऱ्या डावातही लोटांगण घातले व त्यांचा डाव ८१ धावांवर गुंडाळला गेला. रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या जोडीने ४९ धावांचे लक्ष्य सहज पार करत भारताला मालिकेत २-१ ने आघाडी मिळवून दिली. त्याचवेळी या पराभवामुळे इंग्लंडचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
पोलिस उपअधीक्षक पदी नियुक्ती झाल्यानंतर हिमा दास झाली भावूक; म्हणाली, ‘माझे एक मोठे स्वप्न…’
खरंच अहमदाबाद कसोटीची खेळपट्टी होती खराब? जाणून घ्या काय आहेत आयसीसीचे नियम