---Advertisement---

आनंदाचा क्षण! टी२० विश्वषकात पहिल्यांदाच खेळणाऱ्या पीएनजी संघाच्या सपोर्ट स्टाफला राष्ट्रगीतावेळी अश्रू अनावर

On: सोमवार, ऑक्टोबर 18, 2021 2:18 AM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा रविवारी (१७ ऑक्टोबर) सुरू झाली आहे आणि पहिल्या सामन्यात ओमान आणि पापुआ न्यू गिनीचे संघ मैदानात उतरले होते. पहिल्या फेरीच्या ‘ब’ गटातील सामन्यात ओमानचा कर्णधार जीशान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी जेव्हा दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरले, तेव्हा अत्यंत भावनिक दृश्य बघायला मिळाले. पापुआ न्यू गिनीच्या राष्ट्रगीतावेळी सपोर्ट स्टाफच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

सपोर्ट स्टाफच्या डोळ्यातील हे अश्रू अत्यंत कठोर परिश्रमानंतर या टप्प्यावर पोहोचण्याबद्दल होते. पापुआ न्यू गिनीच्या संघाचा टी -२० विश्वचषक स्पर्धेत दोन वेळा थोडक्यात पात्रता गमावल्यानंतर २०१९ मध्ये आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत पात्रता फेरीसाठी पात्र होणारा पहिला संघ ठरला होता.

पापुआ न्यू गिनीच्या संघाला येथे पोहोचणे सोपे नव्हते. हा टप्पा गाठण्यासाठी त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. कोरोनामुळे, पापुआ न्यू गिनी सध्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. या महामारीत काही खेळाडूंनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना गमावले आहे. जवळजवळ २ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर आता संघासमोर आव्हान आहे ते पुन्हा गती मिळवण्याचे. मात्र, सपोर्ट स्टाफने संघाला इथवर आणण्यासाठी दिवस -रात्र एक केले आहेत. स्पर्धेपूर्वी संघाला सलग १२ सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते.

https://twitter.com/imDL45/status/1449705182611132428

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पात्रता फेरीच्या ब गटातील पहिल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनीने ९ गडी गमावून १२९ धावा केल्या. संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर टोनी उरा आणि लिगा सायका खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले.

संघाने १.३ षटकांत दोन गडी गमावले, त्यानंतर कर्णधार असद वालाने चार्ल्स अमिनीसह तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. अमिनीने २६ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या, तर असद वालाने ४३ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या. यासह, असद हा विश्वचषकात अर्धशतक करणारा पहिला खेळाडू ठरला.

या दोन फलंदाजांशिवाय सेस्से बाऊने पोपुआ न्यू गिनीकडून १३ धावा केल्या, तर ८ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. झीशान मकसूदने ओमानकडून ४ बळी घेतले. तर बिलाल खान आणि कलीमुल्लाहने प्रत्येकी २-२ बळी घेतले.

सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमानने १३.४ षटकांत एकही विकेट न गमावता १० विकेट्सने मोठ्या विजयाची नोंद केली. सलामीवीर आकिब इलियास आणि जतिंदर सिंग यांनी ओमानला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला. इलियासने ४३ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ५० धावा केल्या, तर जतिंदर सिंगने ४२ चेंडूत ४ षटकार आणि ७ चौकारांसह ७३ धावांची नाबाद खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल २०२१ मधून भारतीय संघासाठी मिळाले तीन अद्भुत खेळाडू, ‘हा’ अष्टपैलू घेऊ शकतो पांड्याची जागा

अश्विनच्या टी२० विश्वचषकासाठीच्या निवडीवर कर्णधार विराट कोहलीने सोडले मौन; म्हणाला…

रिकी पाँटिंगने धूडकावली भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---