नवी दिल्ली | देशातील क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळविणाऱ्या पॅरालिम्पिकपटूने सोमवारी निवृत्तीची घोषणा केली. दिपा ही पॅरालिम्पिकमध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला एॅथलेट होती.
पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय पॅरालिम्पिक संघटनेचे अध्यक्ष होण्यासाठी तिने ही निवृत्तीची घोषणा केली आहे. तिने हा निर्णय या वर्षाच्या सुरुवातीलाच अध्यक्ष होण्यापुर्वीच घेतला होता.
दिपाने १६ सप्टेंबरलाच राजीनाम्याचे पत्र पीसीसीआयला दिले होते, परंतु त्यांनी सोमवारी हे पत्र खेळ व युवक कल्याण विभागाला दिले. दिपा पीसीसीआयच्या नविन कमिटीच्या स्थापनेची हायकोर्टाच्या आदेशाची वाट पहात होती. जो निर्णय दिपाच्या बाजूने लागला. दिपा भारतातील पॅरालिम्पिकपटूंसाठी काम करणार आहे.