पुणे। लायन्स क्लब ऑफ रहाटणी आणि लिओ क्लब ऑफ रहाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लायन्स क्लब ऑफ रहाटणी करंडक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने लक्ष क्रिकेट अकादमी संघाचा तर एम.जी स्पोर्टस् क्लब संघाने कॅनन क्रिकेट क्लब संघाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
हजारे मैदान, मोशी येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखत लक्ष क्रिकेट अकादमी संघाचा 9 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना अथर्व , आदित्य कापरे व यश सुर्यवंशी यांच्या अचूक गोलंदाजीपुढे लक्ष क्रिकेट अकादमी संघ 23.5 षटकात सर्वबाद 92 धावांत गारद झाला. आनंद बनसोडेने 34 तर धृव विटेने 20 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. अथर्व व आदित्यने प्रत्येकी 3 गडी बाद केले. 92 धावांचे लक्ष शुभम सुपेच्या नाबाद 42 तर संतोष चौहानच्या नाबाद 32 धावांसह परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने 16 षटकात 1 गडी गमावत 93 धावा करून सहज पुर्ण करत अंतिम फेरीत धडाकेबाज प्रवेश केला. 12 धावात 3 गडी बाद करणारा आदित्य कापरे सामनावीर ठरला.
दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत हर्षिल सावंतच्या दमदार अचूक गोलंदाजीच्या बळावर एम.जी स्पोर्टस् क्लब संघाने कॅनन क्रिकेट क्लब संघाचा 9 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना निरज पाचपांडेच्या नाबाद 31 व कृतार्त मैदच्या 23 धावांसह कॅनन क्रिकेट क्लब संघाने 25 षटकात 8 बाद 80 धावा केल्या. हर्षिल सावंतने केवळ 5 धावा देत 6 गडी बाद करत विक्रमी खेळी केली. 80 धावांचे लक्ष अदित्य झोलच्या नाबाद 35 तर आरोश बन्सलच्या 25 धावांसह एम.जी स्पोर्टस् क्लब संगाने 16.2 षटकात केवळ 1 गडी गमावत 81 धावांसह पुर्ण करत अंतिम फेरीत प्रवेश केला. हर्षिल सावंत सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी
लक्ष क्रिकेट अकादमी- 23.5 षटकात सर्वबाद 92 धावा(आनंद बनसोडे 34(52, 5×4), धृव विटे 20(20, 3×4), अथर्व के 3-12, आदित्य कापरे 3-12, यश सुर्यवंशी 2-21) पराभूत वि परंडवाल क्रिकेट अकादमी- 16 षटकात 1 बाद 93 धावा(शुभम सुपे नाबाद 42(40, 6×4), संतोष चौहाण नाबाद 32(45, 5×4), शिवम निलकंठ 1-19) सामनावीर- आदित्य कापरे
परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने 9 गडी राखून सामना जिंकला.
कॅनन क्रिकेट क्लब- 25 षटकात 8 बाद 80 धावा (निरज पाचपांडे नाबाद 31(41, 3×4), कृतार्त मैद 23(52, 3×4), हर्षिल सावंत 6-5, आरोश बन्सल 1-15)पराभूत वि एम.जी स्पोर्टस् क्लब- 16.2 षटकात 1 बाद 81 धावा(अदित्य झोल नाबाद 35(49, 4×4), आरोश बन्सल 25(43, 1×4), प्रतुल तांबे 1-19) सामनावीर- हर्षिल सावंत
एम.जी स्पोर्टस् क्लब संघाने 9 गडी राखून सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
चहल अन् वॉशिंग्टनची जोडी ठरली सुपरहिट!! भारतीय खेळपट्टीवर केवळ दुसऱ्यांदाच केलाय असा कारनामा
Video : …आणि पाकिस्तान विरुद्ध १० विकेट्स घेणाऱ्या अनिल कुंबळेचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहीले गेले





