भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (21 जानेवारी) खेळला जाईल. रायपूर येथील शहीद वीर नारायण स्टेडियम येथे हा सामना होईल. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 12 धावांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाकडून गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी भारतीय संघाविषयी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
दुसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हांब्रे यांनी संघाच्या रणनीती विषयी तसेच अंतिम अकरा विषयी कल्पना दिली. या पत्रकार परिषदेत त्यांना वेगवान गोलंदाज म्हणून पुन्हा एकदा शार्दुल ठाकूर याला संधी देणार की उमरान मलिक याला निवडले जाईल असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना म्हांब्रे म्हणाले,
“मागील सामन्यात शार्दुलला संघात निवडण्याचे कारण संघाची फलंदाजी मजबूत करणे होते. दुसऱ्या सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल हे पाहून अंतिम निर्णय घेण्यात येईल.”
उमरानविषयी बोलताना म्हांब्रे म्हणाले,
“त्याने ज्याप्रकारे प्रगती केली आहे ते पाहून खरोखर आनंद होतो. त्याचा वेग चांगला आहे. त्यामुळे तो आक्रमणात विविधता असतो. तो संघाच्या विश्वचषक रणनितीचा भाग असून, त्याला वारंवार संधी देण्यात येईल.”
उमरानने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत अप्रतिम गोलंदाजी करत सातत्याने बळी मिळवले होते. तर, शार्दुल न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चांगलाच महागडा ठरलेला. त्याने केवळ 7.2 षटकात 54 धावा देत 2 बळी मिळवले होते.
पहिल्या वनडे सामन्यासाठी उभय संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
न्यूझीलंड संघ-
फिन ऍलन, डेवॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.
(Paras Mhambrey Talk About 2nd ODI Playing XI Shardul Thakur And Umran Malik)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“जास्तीत जास्त टी10 लीग खेळवा”, भारताच्या जगज्जेत्या खेळाडूंनी केली मागणी
आपल्याच मुलींमुळे वैतागला डेविड वॉर्नर! इच्छा नसतानाही करायला लावत आहेत डान्स