क्रिडाविश्वातून सध्या हृदयविकाराच्या झटक्याने क्रिडापटूंचा मृत्यू झाल्याच्या बातम्या सर्रास येताना दिसत आहेत. मैदानावर खेळ सुरू असताना हृदयविकाराचा झटका येऊन मोठ्या प्रमाणात क्रिडापटूंचे निधन होत आहे. परभणी शहरातून अशीच एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. परभणी शहरातील एका तरुण उद्योजकाला बॅटमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सदर घटना गुरुवारी (२५ ऑगस्ट) घडली आहे. सचिन तापडिया असे या मृत उद्योजकाचे नाव आहे. सचिन तापडिया यांचा असा अचानक मृत्यू झाल्याने त्यांची दोन मुले पोरकी झाली आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, परभणीतील तरुण उद्योजक सचिन तापडिया यांना बॅडमिंटन खेळताना छातीत दुखायला लागले. पहिला गेम खेळल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. मग त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर मित्रांनी त्यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचाराआधीच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सचिन तापडिया हे दररोज शिवाजी कॉलेजच्या इनडोअर मैदानात बॅडमिंटन खेळण्यासाठी यायचे. तापडिया यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. अचानक मृत्यू झाल्यामुळे दोन मुले पोरकी झाली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ENGvSA: दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस साहेबांचा; अँडरसन-ब्रॉड चमकले
PHOTOS: जगातील सर्वात महागड्या हॉटेलमध्ये राहतेय टीम इंडिया! किंमत आणि सुविधा पाहून थक्क व्हाल
अखेर पंजाब किंग्सचा कुंबळेंना ‘थँक्यू व्हेरी मच’! मुख्य प्रशिक्षक म्हणून ‘ही’ नावे पुढे