परभणी पांचाला प्राईड विरुद्ध धुळे चोला वीरांस यांच्यात आजची पहिली लढत झाली. परभणी संघाच्या मारुती राठोड ला चढाईपटू व बचावपटूंची चांगली साथ होती. तर धुळेच्या मितेश कदम संघातील इतर खेळाडूंची साथ मिळवत नव्हती. परभणी संघाच्या मारुती राठोड ने आक्रमक चढाया करत धुळे संघाला ऑल आऊट केले.
मध्यंतराला परभणी संघाकडे 26-16 अशी आघाडी होती. धुळे कडून मितेश कदम आजही एकटाच प्रतिकार करताना दिसत होता. तर मारुती राठोड ने पहिल्या हाफ मध्येच सुपर टेन पूर्ण करत आघाडी मिळवून देण्यात महत्वाची भूमिका घेतली. तर पकडीत पंकज राऊत व उद्देश बोचरे यांनी चांगल्या पकडी केल्या.
मारुती राठोड च्या आक्रमक खेळाने परभणी कडे शेवटची 10 मिनिटं शिल्लक असताना 40-28 आघाडी होती. अखेर परभणी ने सामना 54-49 अश्या फरकाने जिंकला. मारुती राठोड ने चढाईत 20 गुण मिळवले. तर उद्देश बोचरे ने चढाईत 5 तर पकडीत 4 गुण मिळवत अष्टपैलू खेळ केला. तर पंकज राऊत ने जबरदस्त 8 पकडी केल्या. तर धुळे च्या मितेश कदम ची 22 गुणांची खेळी व्यर्थ ठरली. (Parbhani Panchala Pride team beat Dhule Chola Veerans)
बेस्ट रेडर- मितेश कदम, धुळे चोला वीरांस
बेस्ट डिफेंडर्स- पंकज राऊत, परभणी पांचाला प्राईड
कबड्डी का कमाल- मारुती राठोड, परभणी पांचाला प्राईड
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
घरच्या मैदानावर आरसीबीचा दणदणीत विजय! दिल्लीचा सलग पाचवा पराभव, वैशाकचे दमदार पदार्पण
LSGvPBKS: शिखर धवनला दुखापत, सॅम करूनच्या नेतृत्वातील पंजाबचा गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग इलेव्हन







3 माफीनामे आणि मेस्सीसाठी खास मॅसेज! 24 तासांमध्ये रोनाल्डोची दुसरी बाजू समोर