---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिक : टेबल टेनिसमध्ये भारताचा दबदबा, बॅडमिंटनमध्येही शानदार कामगिरी

On: शनिवार, जुलै 27, 2024 8:22 PM
---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं पुरुष एकेरीत पहिला साखळी सामना जिंकला आहे. लक्ष्य सेननं ग्वाटामालाच्या केविन कॉर्डेनचा 21-8, 22-20 असा पराभव केला. यासह लक्ष्य सेननं पॅरिस ऑलिम्पिकची सुरुवात विजयानं केली. भारताच्या या स्टार बॅडमिंटनपटूकडून देशाला पदकाची अपेक्षा आहे.

दुसरीकडे, पुरुषांच्या टेबल टेनिसमध्ये भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. हरमीत देसाईनं जॉर्डनच्या झैद अबो यामनचा 4-0 असा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला आहे. 30 मिनिटे चाललेल्या या सामन्यात देसाईनं 4-0 (11-7, 11-9, 11-5, 11-5) असा विजय मिळवला.

बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेननं पहिला गेम अवघ्या 14 मिनिटांत 21-8 असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये तो एकवेळ 16-20 असा पिछाडीवर होता. मात्र तेथून त्यानं पुनरागमन करत सलग 6 पॉईंट घेतले आणि गेम 22-20 असा जिंकला. लक्ष्यचा पुढील साखळी सामना बेल्जियमच्या ज्युलियन कारागीचा होणार आहे.

या 22 वर्षीय भारतीय खेळाडूनं सामन्यात वेगवान सुरुवात केली आणि पहिल्या सेटमध्ये आपल्या 37 वर्षीय प्रतिस्पर्ध्याला कोणतीही संधी दिली नाही. सेननं चमकदार कामगिरी करत पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत 11-3 अशी आघाडी घेतली. यानंतरही त्यानं आपली लय कायम ठेवत पहिला सेट 21-8 असा जिंकला.

दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला ग्वाटामालाचा खेळाडू केविन कॉर्डननं गेममध्ये शानदार पुनरागमन करत सेनवर 6-2 अशी आघाडी घेतली. सेननं या सेटमध्ये अनेक चुका केल्या आणि अनेक वेळा शटल नेटमध्ये मारले. मध्यांतरात पिछाडीवर पडल्यानंतर लक्ष्यनं पुनरागमन केलं. त्यानं पिछाडी भरुन काढत गेम 22-20 असा जिंकून सामना 21-8, 22-20 असा जिंकला.

हेही वाचा – 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये डोपिंगचे पहिले प्रकरण समोर, इराकच्या जुडोपटूचे स्वप्न भंगणार
हँडबॉलपटूने हॉकी खेळाडूला सर्वांसमोर केले ‘फिल्मी स्टाईल प्रपोज’, पाहा व्हिडिओ
पॅरिस ऑलिम्पिकमधून आनंदाची बातमी! मनू भाकरची पदकाच्या दिशेनं वाटचाल; या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---