पॅरिस पॅरालिम्पिक भारतासाठी आतापर्यंत शानदार राहिलं आहे. दुसऱ्याच दिवशी देशाला 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदकं मिळाली. आज म्हणजेच तिसऱ्या दिवशी (31 ऑगस्ट) भारताची पदकसंख्या आणखी वाढू शकते. तिसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात एकूण 4 पदकं येऊ शकतात. दुसऱ्या दिवशी भारतानं पॅरा नेमबाजी आणि ॲथलेटिक्समध्ये पदकांची कमाई केली. आज पॅरा सायकलिंग आणि पॅरा नेमबाजीतही सुवर्णपदक अपेक्षित आहे. मात्र पदक आणण्यासाठी भारतीय खेळाडूंना अंतिम फेरीसाठी पात्र व्हावं लागेल.
काल (30 ऑगस्ट) अवनी लेखरा सलग दुसरं सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरली. तिनं यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. अवनीनं पॅरिसमध्ये 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत सुवर्णपदक कमावलं. याच इव्हेंटमध्ये मोना अग्रवालनं कांस्यपदक पटकावलं. मनीष नरवालनं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल (SH1) स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं. तर प्रीती पालनं महिलांच्या T35 प्रकारात 100 मीटर शर्यतीत कांस्यपदकाची कमाई केली.
पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताचं वेळापत्रक (31 ऑगस्ट)
पॅरा बॅडमिंटन
महिला एकेरी SL3 गट प्ले स्टेज – दुपारी 12 वा
पुरुष एकेरी SL3 गट प्ले स्टेज – दुपारी 1:20 वा
पुरुष एकेरी SL4 गट प्ले स्टेज – दुपारी 2:40 वा
पुरुष एकेरी सेट 4 गट प्ले स्टेज – दुपारी 3:20 वा
महिला एकेरी SU5 ग्रुप प्ले स्टेज – दुपारी 4 वा
शूटिंग
पुरुषांची 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 (पात्रता) – स्वरूप महावीर उन्हाळकर – दुपारी 1:00 वा
महिला 10 मीटर एअर पिस्तूल एसएच1 (पात्रता) – रुबिना फ्रान्सिस – दुपारी 3.30 वा
ट्रॅक सायकलिंग
महिलांची 500 मीटर टाईम ट्रायल C1-3 (पात्रता) – ज्योती गडेरिया – दुपारी 1.30 वा
पुरुषांची 1000 मीटर टाईम ट्रायल C1-3 (पात्रता)- अर्शद शेख – दुपारी 1.49 वा
नौकानयन
मिश्रित PR3 डबल स्कल्स (रिपेचेज) – भारत (अनिता आणि नारायण कोंगनापल्ले) – दुपारी 3.00 वा
तीरंदाजी
महिला कंपाऊंड (1/8 एलिमिनेशन 2) – सरिता देवी विरुद्ध एलिओनोरा सरती (इटली) – सायंकाळी 7.00
महिला कंपाउंड (1/8 एलिमिनेशन 8) – सरिता देवी विरुद्ध मारियाना झुनिगा (चिली) – रात्री 8.59 वाजता
ॲथलेटिक्स
पुरुष भालाफेक F57 (पदक स्पर्धा) – प्रवीण कुमार – रात्री 10.30 वा