पॅरिस ऑलिम्पिकनंतर आता चाहत्यांच्या नजरा पॅरालिम्पिक 2024 वर लागल्या आहेत. पॅरालिम्पिक खेळांना 28 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. हा मेगा इव्हेंट 8 सप्टेंबरपर्यंत चालेल. पॅरालिम्पिक 2024 साठी भारतानं 84 खेळाडूंची तुकडी पाठवली आहे. परंतु पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी कशी राहिली, हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहित तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत एकूण 31 पदकं जिंकली आहेत. यंदा 84 भारतीय खेळाडू 12 खेळांमध्ये आपली दावेदारी सादर करतील. पॅरालिम्पिकमधील ही भारताची आतापर्यंतचा सर्वात मोठी तुकडी आहे. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये 54 खेळाडूंनी भाग घेतला होता आणि विक्रमी 19 पदकं जिंकली होती.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतील भारताचे ध्वजवाहक असतील. भावना पटेल टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पॅरा गेम्समध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय टेबल टेनिस खेळाडू होती. तिनं रौप्य पदक मिळवलं होतं. यंदा देखील भारतीय खेळाडू गेल्या वेळच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करतील.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू 12 खेळांमध्ये आपली दावेदारी सादर करतील. हे खेळ पुढीप्रमाणे आहेत – पॅरा बॅडमिंटन, पॅरा कॅनोइंग, पॅरा आर्चरी, पॅरा ॲथलेटिक्स, पॅरा सायकलिंग, ब्लाइंड ज्युडो, पॅरा पॉवरलिफ्टिंग, पॅरा नेमबाजी, पॅरा टेबल टेनिस, पॅरा स्विमिंग आणि पॅरा तायक्वांदो
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 5 सुवर्ण पदकांव्यतिरिक्त 8 रौप्य पदकं आणि 6 कांस्य पदकं जिंकली होती. यंदा भारताच्या पदकांची संख्या वाढू शकते, असं मानलं जात आहे. आता भारतीय खेळाडू पॅरिसमध्ये किती पदकं जिंकतात हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा –
शमीनं केस कापण्यासाठी खर्च केले 1 लाख रुपये? कमबॅक करण्यापूर्वी हा ‘किलर लूक’ एकदा पाहाच
रोहित शर्मा बनेल सचिन तेंडुलकरपेक्षाही मोठा सलामीवीर, शतकांचा हा विक्रम मोडून रचेल इतिहास!
चेतेश्वर पुजारासोबत हे काय घडतंय! भारतीय संघापाठोपाठ या विदेशी संघानंही दाखवला बाहेरचा रस्ता