आयपीएलचा १५ वा हंगाम मार्च महिन्याच्या शेवटी सुरु होणार आहे. तत्पुर्वी १२ आणि १३ फेब्रुवारीला आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. या लिलावात सुरेश रैनासारख्या अनेक दिग्गजांना खरेदीदार मिळाला नाही. तर, इशान किशनसारख्या काही खेळाडूंसाठी लिलावात स्पर्धा पाहायला मिळाली. अमित मिश्रा (Amit Mishra) याला सुद्धा लिलावात कोणीच खरेदी केले नाही. अमित मिश्रा आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. परंतु ‘मिशी भाई’ म्हणून प्रसिद्ध असलेला हा खेळाडू यावेळी आयपीएलमध्ये विकला गेला नाही. यानंतर त्याचा जुना संघ दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल (Parth Jindal) यांनी ट्विटरवर त्याची आठवण काढत लिहले की तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा जीव नेहमीच राहील.
अमित मिश्रा संघात परत आल्याने आनंद होईल असे पार्थ जिंदाल यांनी म्हटलं आहे. पार्थ यांनी ट्विट करून लिहिले, “आयपीएलच्या महान खेळाडूंपैकी एक अमित. तू गेल्या काही वर्षांत संघासाठी जे काही केले आहेस त्याबद्दल आम्ही तुला सलाम करतो. तुझ्याजवळील अनुभव खूप मौल्यवान असल्याने तुझ्यासाठी योग्य असलेल्या कोणत्याही भूमिकेत तुला पुन्हा संघात सहभागी करून घेण्यास आम्हाला आनंद होईल. मिशी भाई दिल्ली कॅपिटल्स हा आयुष्यभर तुझा संघ आहे.’
To one of the @IPL greats @MishiAmit we @DelhiCapitals would like to salute everything you have done for us over all these years and would love to have you back at DC in whatever capacity you see fit as your insights would be most valuable. Mishy bhai DC is yours for life
— Parth Jindal (@ParthJindal11) February 13, 2022
अमित मिश्रा त्याची मूळ किंमत १.५ कोटी रुपये ठेवून लिलावात उतरला होता. तो फिरकी गोलंदाज असून, त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १५४ सामने खेळले आहेत आणि १६६ विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. तरी सुद्धा यावेळी लिलावात त्याचे नाव येताच लीगच्या १० फ्रँचायझींपैकी एकाही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही.
अमित मिश्राच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्ट्रिक्स आहेत. त्याने तीन हॅटट्रिक घेतल्या आहेत. आयपीएलच्या पहिल्या हंगामात त्याने पहिली हॅटट्रिक घेतली असून तेव्हा तो दिल्ली डेअरडेविल्स संघात खेळत होता. यानंतर २०११ मध्ये डेक्कन चार्जर्स संघात असताना त्याने हॅटट्रिक घेतली होती. २०१३ मध्येही त्याने हॅट्ट्रिक घेतली होती आणि तेव्हा तो सनरायझर्स हैदराबादसोबत होता. त्याने आयपीएलमध्ये चार वेळा चार विकेट घेतल्या आहेत. २७ एप्रिल २०२१ रोजी त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी खेळलेल्या शेवटचा सामन्यात त्याने तीन षटके टाकत २७ धावांत एक विकेट घेतली होती.
महत्वाच्या बातम्या-
डू प्लेसिस, कोहली, मॅक्सवेल; कोण होईल आरसीबीचा भावी कर्णधार? माइक हेसनने केला खुलासा (mahasports.in)
स्टीव्ह स्मिथचे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहून सर्वच झाले आश्चर्यचकित, पाहा व्हिडिओ (mahasports.in)