मुंबई | आयपीएलचे हे ११वे पर्व आहे. आजपर्यंत या स्पर्धेत वेगवेगळे १३ संघ गेल्या १० वर्षांत झाले आहेत. त्यात पुण्याचे दोन, गुजरातचा एक, डेक्कन आणि कोचीचा एक संघ आता या स्पर्धेचा भाग नाही.
या स्पर्धेत जरी १३ संघ आजपर्यंत खेळले असतील तरी एक असाही खेळाडू आहे त्याने १३ पैकी तब्बल ६ वेगवेगळ्या संघाकडून खेळला आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून यष्टीरक्षक पार्थिव पटेल आहे. पार्थिवने २०१० पासून अायपीएल खेळायला सुरूवात केली. त्यानंतर प्रत्येक मोसमात तो वेगवेगळ्या संघाकडून खेळत आला आहे.
त्याने २०१०मध्ये चेन्नईकडून, २०११ला कोची, २०१२ला डेक्कन, २०१३ला हैद्राबाद, २०१४ला बेंगलोर, २०१५ ते २०१७मध्ये मुंबई तर २०१८मध्ये तो पुन्हा बेंगलोरकडून खेळत आहे.
पार्थिव पटेल आजपर्यंत ११९ सामने खेळले असून त्यात २३२२ धावा केल्या आहेत.