भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील थरारक तिसरा टी-20 सामना बुधवारी (18 जानेवारी) खेळला गेला. सामना निकाली निघण्यासाठी दोन सुपर ओव्हर खेळल्या गेल्या. कर्णधार रोहित शर्मा याने कारकिर्दीतील पाचवे टी-20 शतक ठोकत भारताला या सामन्यात विजय मिळवून दिला. या अप्रतिम खेळीसाठी रोहित शर्माचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने रोहितच्या खेळीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी 17 धावा हव्या होत्या. सुपर ओव्हरच्या पहिल्या पाच चेंडूंमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पहिल्या पाच चेंडूंमध्ये 6 चौकार आणि दोन वेळा एक-एक धाव घेतली. षटकातील शेवटचा चेंडू बाकी असताना भारताला अजून दोन धावा हव्या होत्या. पण त्याआधीच रोहित रिटायर्ड आऊट झाला. रोहितच्या निर्णयाबाबत अनेकांना आश्चर्य वाटले, पण कर्णधार मैदानाबाहेर गेला. शेवटच्या चेंडूवर रोहितच्या जागी रिंकू सिंग मैदानात आला. पण शेवटच्या चेंडूवर ट्राईकवर असलेल्या यशस्वी जयस्वाल याला दोन धावा करता आल्या नाहीत. जयस्वालने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतल्यामुळे सामना दुसऱ्या सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला.
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताला विजय मिळाला. रवी बिश्नई याने एक धाव खर्च करून अफगाणिस्तानच्या दोन विकेट्स घेतल्या आणि तीन चेंडूत भारताला विजय मिळवून दिला. असे असले तरी, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्मा पुन्हा खेळपट्टीवर उतरला होता. असात त्याच्या दुखापतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बांगालदेश क्रिकेट संघाने लाईव्ह सामन्यात पंचांना विचारणा केली होती. पण पंचांनी यावर कुठलाच ठोस निर्णय घेतला नाही. आता समालोचकाची जबाबदारी पार पाडत असलेल्या पार्थिव पटेल (Parthiv Patel) याने मात्र रोहितसह पंचांवर देखील प्रश्न उपस्थित केले.
सामना संपल्यानंतर पार्थिव पटेल म्हणाला, “रोहित शर्मा रिटायर्ड आऊट झाला होता. पण तरीही दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये तो फलंदाजीला आला. रोहितने रिटायर्ड आऊट झाल्यानंतर परत फलंदाजीला यायलाच नव्हते पाहिजे. मला वाटते ही पंचांची चूक आहे.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करताना 212 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात 20 षटकांमध्ये अफगाणिस्तान संघाने देखील 212 धावा केल्या. परिणामी सामना सुपर ओव्हरपर्यंत तानला गेला. विशेष म्हणजे पहिल्या सुपर ओव्हरनंतर देखील सामना निकाली निघाला नाही. दोन्ही संघांनी या षटकात 16-16 धावा केल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मात्र भारताने प्रथम फलंदाजी करताना 11 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तारात अफगाणिस्तान संघ अवघी एक धाव करू शकला.
भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत असताना रोहित शर्मा याने 69 चेंडूत 121* धावांपर्यंत मजल मारली. टी-20 कारकिर्दीत ही त्याची सर्वात मोठी खेळी आणि पाचवे शतक होते. रिंकू सिंग यानेही 39 चेंडूत 69* धावांचे योगदान दिले. (IND vs AFG 2nd t20i । Parthiv Patel raised questions about Rohit Sharma’s Retired out)
महत्वाच्या बातम्या –
IND vs AFG: रोहित-नबी यांच्या वादावर राहुल द्रविडचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘नबीने नियमानुसार…’
IND vs AFG: ‘सामना एक विक्रम अनेक’ बेंगलोर टी20 मध्ये बनले ‘हे’ मोठे विक्रम, जे मोडणे केवळ अशक्यच