भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिला कसोटी सामना ऍडलेड येथे खेळल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतण्यासाठी निघाला आहे. विराटच्या या निर्णयाबाबत क्रिकेट वर्तुळात वेगवेगळी मते दिसून येत आहेत. अशातच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेट खेळाडू स्टीव स्मिथने विराटच्या या निर्णयाची पाठराखण केली आहे.
मेलबर्न येथे 26 तारखेपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना स्मिथ म्हणाला,’ मी सामन्याच्या शेवटी विराटला त्याच्या प्रवासासाठी व होणार्या बाळासाठी शुभेच्छा दिल्या. मी विराटला असे म्हणालो की माझ्या वतीने तुझ्या पत्नीला देखील बाळाच्या जन्मासाठी शुभेच्छा दे.’
स्मित पुढे म्हणाला,’ निश्चितच मालिकेच्या सुरुवातीला विराटवर पूर्ण मालिका खेळण्याचा दबाव होता. मात्र पालकत्व रजा घेऊन त्याचा भारतात परतण्याचा निर्णय योग्य आहे. प्रत्येकाच्या जीवनात हा एक खास क्षण असतो ,जो तुम्ही कुठल्याही परिस्थितीत गमावू शकत नाही.’
लाल चेंडूने सामना खेळायला आवडते – स्मिथ
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात झालेला पहिला कसोटी सामना दिवस-रात्र खेळवला गेला होता. त्यामुळे या सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर करण्यात आला. या सामन्यादरम्यान शेन वॉर्नने म्हटले होते की कसोटी क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूचा वापर करण्यात यावा. पण, या विधानाबद्दल स्मिथ असहमत असल्याचे दिसले. स्मिथ म्हणाला,’ आम्ही जरी गुलाबी चेंडूने भरपूर सामने खेळलेले असलो ,तरी वैयक्तिकरित्या मला लाल चेंडूनेच कसोटी सामने खेळायला आवडेल’.
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया मधील मालिकेतील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर सुरू होणार आहे. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवाला मागे टाकत भारतीय संघ कशाप्रकारे मैदानात पुनरागमन करतो, यावर सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोना व्हायरसमुळे इंग्लंडची चिंता पुन्हा वाढली; ‘या’ दौर्याबद्दल आली मोठी माहिती समोर
‘विराट तर गेला, आता पाहू भारतीय संघ कशाप्रकारे उर्जा मिळवणार’
‘अरुण जेटली स्टेडियमच्या स्टँडवरील माझे नाव तात्काळ हटवण्यात यावे’, बिशनसिंग बेदींची धक्कादायक मागणी
ट्रेंडिंग लेख –
टॉप ३ : टी२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावांची खेळी करणारे यष्टिरक्षक
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या आयुष्यातील माहीत नसलेल्या ४ गोष्टी
सोळा वर्षे आणि सोळा गोष्टी! जाणून घ्या धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोमांचक प्रवास