आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्रथमच आयोजित केलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान खेळला जाईल. इंग्लंडमधील एजबॅस्टनच्या मैदानावर दोन्ही संघ १८ ते २२ जून दरम्यान भिडतील. या अंतिम सामन्यापूर्वी अनेक आजी-माजी खेळाडूंनी आपापली ड्रीम टीम घोषित करत आहेत.
ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार व प्रसिद्ध वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने नुकतीच आपली ‘वर्ल्ड टेस्ट इलेव्हन’ जाहीर केली. यामध्ये भारताच्या चार खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या संघात स्थान दिले गेल्याचे त्याने सांगितले.
असा आहे संघ
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर पॅट कमिन्सने जाहीर केलेल्या ‘वर्ल्ड टेस्ट इलेव्हन’ मध्ये अनेक बड्या खेळाडूंना स्थान मिळाले तर, काहींना या संघाचा भाग होता आले नाही.
कमिन्सच्या संघात सलामीवीर म्हणून भारताचा रोहित शर्मा व ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यांना संधी देण्यात आली आहे. त्यानंतर मधल्या फळीची जबाबदारी ही आधुनिक क्रिकेटमधील ‘फॅब फोर’ पैकी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन, भारताचा कर्णधार विराट कोहली व ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ यांच्यावर सोपवली. या संघात सहाव्या क्रमांकावर इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स तर, यष्टिरक्षक म्हणून भारताचा रिषभ पंत यांची निवड केली गेली आहे.
या संघातील वेगवान गोलंदाजीच्या विभागाचे नेतृत्व पॅट कमिन्सने स्वतःकडे ठेवले असून, त्याला भारताचा जसप्रीत बुमराह व दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा हे साथ देतील. संघातील एकमेव फिरकीपटू म्हणून नॅथन लायन याला निवडले गेले आहे.
पॅट कमिन्सचा वर्ल्ड टेस्ट इलेव्हन संघ-
रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, रिषभ पंत (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, जसप्रीत बुमराह, कगिसो रबाडा, नॅथन लायन.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मिळाला नवा सलामीवीर, ७३ ची आहे सरासरी
बीसीसीआयने टी२० विश्वचषकाबाबत निर्णय घेण्यासाठी मागितला एक महिन्याचा अवधी, ‘हे’ आहे कारण
टी२० विश्वचषकापूर्वी रिकी पाँटिंगला आली एमएस धोनी, हार्दिक पंड्याची आठवण, का ते घ्या जाणून